पेट्रोलचे भाव वाढवू नका, केंद्राचा पेट्रोलियम कंपन्यांना सल्ला

पेट्रोलचे भाव वाढवू नका, केंद्राचा पेट्रोलियम कंपन्यांना सल्ला

पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले असतानाच आता काही काळ भाववाढ करू नका असा सल्ला केंद्र सरकारनं सरकारी पेट्रोलिय कंपन्यांना केला आहे. 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.11 एप्रिल: पेट्रोल आणि डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले असतानाच आता काही काळ भाववाढ करू नका असा सल्ला केंद्र सरकारनं सरकारी पेट्रोलिय कंपन्यांना केला आहे. 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यामुळं किंमतींनी चार वर्षातला उच्चांक गाठला होता. आणखी भाव वाढले तर लोकांचा असंतोष वाढेल अशी भीती केंद्र सरकारला आहे. त्यामुळं सरकारनं आधीच पेट्रोलिम कंपन्यांना सल्ला दिलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

इंडियन ऑईल पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला सरकारनं या सूचना केल्या आहेत. भाव वाढवले नाहीत तर लिटरमागे या कंपन्यांना 1 रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. दक्षिण आशियात भारतात सर्वात जास्त पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आहेत. भारत आपल्या गरजेपैकी तब्बल 80 टक्के तेलाची आयात करतो. त्यामुळं त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्ची करावं लागतं. गेल्या काही दिसांमध्ये आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारात किंमती वाढत असल्यानं त्याचा भार या तेलकंपन्यांवर पडतो आहे.

 

First published: April 11, 2018, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading