मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /‘मी त्यांची बँड वाजवायचो म्हणून माझ्यावर चिढतात’; गोविंदा बॉलिवूडवर संतापला

‘मी त्यांची बँड वाजवायचो म्हणून माझ्यावर चिढतात’; गोविंदा बॉलिवूडवर संतापला

बॉलिवूडमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अभिनेता गोविंदाचा खळबळजनक दावा

बॉलिवूडमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अभिनेता गोविंदाचा खळबळजनक दावा

बॉलिवूडमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अभिनेता गोविंदाचा खळबळजनक दावा

  मुंबई 17 मार्च:  “बॉलिवूडमधील घराणाहीनं माझ्या उमेदीच्या काळात मला सेक्स आणि हिंसाचाराचा भरणा असलेले चित्रपट ऑफर केले होते. मला केवळ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून ओळख मिळावी असा त्यांचा कट होता. मात्र प्रमुख भूमिका असलेले चित्रपट मिळवून त्यांचा तो कट मी उधळून लावला. मी केवळ सुपरस्टार अभिनेताच नाही तर चित्रपट निर्माता देखील झालो. मी माझ्या विरोधकांचा बँड वाजवला असा खळबळजनक दावा अभिनेता गोविंदा यानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्याची ही मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे.

  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळं बॉलिवूडमधील घराणेशाही हा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला. सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागली. स्टार किड्सवर जोरदार टीका होत होती. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी देखील केली जात होती. असाच काहीसा भेदभाव माझ्याही बाबतीत या बॉलिवूडनं केला आसाही दावा गोविंदानं या मुलाखतीत केला आहे. “माझ्या यशावर जळणाऱ्यांनी माझे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले नाहीत त्यामुळं मला कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागला.”

  अवश्य पाहा - पाहा अरुण जेठलींची ग्लॅमरस भाची; अल्ट बालाजीवर येतेय नवी वेब सीरिज

  या मुलाखतीत त्याने इनसायडरविरुद्ध आउटसायडर या विषयी त्याची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘माझ्य उमेदीच्या काळात मी अनेक चित्रपट नाकारले होते अशी अफवा सध्या सगळीकडे पसरवली जात आहे. नेहमी माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातच असतात. हा आणखी एक प्रयत्न आहे. पण मी तुम्हाला यामागचं सत्य सांगतो सेक्स आणि हिंसाचार असलेले चित्रपट मला ऑफर करून ते करायला लावायचे आणि माझी चांगल्या हिरोची प्रतिमाच उभी करून द्यायची नाही असं कट कारस्थान प्रस्थापित कलाकार, निर्माते यांनी रचलं होतं. जर मला सेक्सला प्राधान्य असलेले चित्रपट करायचे असते तर त्यापेक्षा मी पॉर्न फिल्मस केल्या नसत्या का?’

  हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रस्थापितांपैकी एक गट गोविंदाविरुद्ध होता. याबद्दल सविस्तर बोलताना गोविंदानी सांगितलं की, ‘गोविंदाला चित्रपटात 15 सीन आणि दोन गाणी द्या आणि नंतर त्याला फक्त गाणी करायला लावू आणि त्याचा भगवानदादा करून टाकून त्यानंतर तो ज्युनिअर आर्टिस्टच राहील अशा चर्चा मुंबईतील अनेक प्रॉडक्शन हाउसेसच्या ऑफिसमध्ये तेव्हा सुरू होत्या हे माझ्या कानांवर आलं होतं. पण मी त्यांना यशस्वी होऊच दिलं नाही. मी त्यांचा बँड वाजवला. मी हिरो म्हणूनच प्रसिद्ध झालो आणि नंतर निर्माताही झालो. तिथं माझ्या फिल्मला थिएटर मिळू दिली गेली नाहीत ती एक निराळीच कथा आहे.’

  या कटामध्ये गोविंदाच्या जवळच्या लोकांचाच सहभाग होता असंही त्याने सांगितलं. ‘जेव्हा तुमचं नशीब फिरतं तेव्हा तुमच्या जवळचेही तोंड फिरवून घेतात असं म्हणतात ना ते मी प्रत्यक्ष अनुभवलं. माझ्या जवळच्यांनीच मला त्या काळात दगा दिला.’ गोविंदाने हिंदी चित्रपटसृष्टीतली आपली कारकीर्द खूप गाजवली आहे. हत्या, राजाबाबू, हिरो नंबर 1, कुली नंबर 1, हसीना मान जाएगी यासारखे एकापेक्षा एक चित्रपट दिले. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा त्याचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपटही खूप गाजला. आता तो दुसरी इनिंग सुरू करण्याच्या प्रयत्नांत होता. त्याचा एक चित्रपट आलाही होता पण तो चालला नाही.

  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment