मोदी सरकारचा बँकांना मदतीचा हात, 88 हजार कोटींचा निधी जाहीर

मोदी सरकारचा बँकांना मदतीचा हात, 88 हजार कोटींचा निधी जाहीर

मोदी सरकारने बुडीत बँकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. ज्या बँका बुडीत कर्जाने बेजार झाल्या आहेत त्यांना सरकारने मोठी मदत जाहीर केलीये

  • Share this:

25 जानेवारी : राष्ट्रीयकृत बँकांची आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मार्च महिन्यापर्यंत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सरकार ८८ हजार कोटी रुपये ओतणार आहे.

मोदी सरकारने बुडीत बँकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. ज्या बँका बुडीत कर्जाने बेजार झाल्या आहेत त्यांना सरकारने मोठी मदत जाहीर केलीये.  बुडीतकर्जांनी बेजार झालेल्या या बँकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे.  यामध्ये सर्वात जास्त भांडवल, म्हणजे १० हजार ६१० कोटी आयडीबाआय बँकेला मिळणार आहेत. तर त्यापाठोपाठ बँक आॅफ इंडिया दुसऱ्या स्थानावर असून 9232 कोटी मिळणार आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळात सर्वात जास्त पैसा जमा झालेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाला 8800 कोटी मिळणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजय मल्ल्याने स्टेट बँकेचेच तब्बल 9000 कोटी बुडवले आहे. मात्र, ही मदत जरी असली तरी या प्रक्रियेला फेरभांडवलीकरण असं म्हटलं जातं.

कोणत्या बँकेला किती पैसे मिळणार ?

IDBI बँक - 10,610 कोटी

बँक ऑफ इंडिया - 9232 कोटी

स्टेट बँक ऑफ इंडिया - 8800 कोटी

युको बँक -  6507 कोटी

पंजाब नॅशनल बँक - 5473 कोटी

बँक ऑफ बरोडा - 5375 कोटी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 5158 कोटी

कॅनरा बँक - 4865 कोटी

युनिअन बँक ऑफ इंडिया - 4524 कोटी

देना बँक - 3045 कोटी

बँक ऑफ महाराष्ट्र - 3173 कोटी

कॉर्पोरेशन बँक - 2187 कोटी

सिंडिकेट बँक - 2839 कोटी

अलाहाबाद बँक - 1500 कोटी

First published: January 25, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading