शेतीपूरक वाहनं असणाऱ्यांनाही मिळणार 10 हजारांची उचल

शेतीपूरक वाहनं असणाऱ्यांनाही मिळणार 10 हजारांची उचल

तसंच २० हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही मदत मिळू शकणार आहे.

  • Share this:

20 जून : शेतकऱ्यांसाठीच्या 10 हजारांच्या उचलीचे निकष बदलले जाणार आहेत. आता 10 लाखाच्या आत किमतीची गाडी असणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसंच शेतीपूरक वाहनं असलेल्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण, याची अंमलबजावणी करण्यासाठी निकष आणि अटी टाकल्या आहेत.

दररोज वेगवेगळे निकष बदलेले जात आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांच्या हाती एक पैसाही आला नाही. त्यातच आता आणखी एक निकष बदलण्याची नाचक्की सरकारवर आलीये.  आता 10 लाखाच्या आत किमतीची गाडी असणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

तसंच २० हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही मदत मिळू शकणार आहे. पंचायत समिती सदस्यांना मात्र निकषातून वगळण्यात आलंय तर सहकारी संस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष वगळून इतर सदस्यांना मदत मिळणार आहे.

10 हजारांची उचल देण्याबाबतचे निकष बदलले

 

- 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या गाड्या असणाऱ्यांना मदत

- शेतीपूरक वाहनं असलेल्यांनाही मिळणार मदत

- 20 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना मदत

- पंचायत समिती सदस्यांना निकषांतून वगळलं

- सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना मात्र मदत नाही

- सहकारी संस्थांच्या इतर सदस्यांना मिळणार मदत

First published: June 20, 2017, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading