लग्नपत्रिकेतून पोचवलाय शासकीय संदेश

लग्नपत्रिकेतून पोचवलाय शासकीय संदेश

शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अायुक्त सचिन खाडे यांनी चक्क अापल्या लग्नपत्रिकेचा वापर केलाय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, 15 एप्रिल : शासकीय योजना, धोरण लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जाताहेत. पोस्टर, बॅनर, माध्यमांमध्ये जाहिरात असे अनेक खर्चिक उपाय केले जात अाहेत. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अायुक्त सचिन खाडे यांनी चक्क अापल्या लग्नपत्रिकेचा वापर केलाय.

सचिन खाडे हे कोल्हापूर महानगरपालिकेत सहाय्यक अायुक्त म्हणून ते काम करतात. नोकरी करताना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड असते. 1 मे रोजी  महाराष्ट्र दिनादिवशी त्यांच लग्न अाहे. या लग्नासाठी ते पत्रिका छापणारच नव्हते. मात्र घरातल्यांच्या अाग्रहामुळे पत्रिका छापली, मात्र ती शासकीय माहिती पत्रकासारखी.

या पत्रिकेतून ते स्वच्छ भारताचा संदेश देत अाहेत. त्याचबरोबर बेटी बचाअो बेटी पढाअो, डिजीटल साक्षरता अभियान,  बाळासाठी मातेचं दूध अावश्यक अाहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजना, पर्यावरण वाचवा अशा बाबतीतले संदेश या पत्रिकेतून देण्यात येत अाहेत.

पत्रिकेच्या पहिल्या पानावर कोल्हापूर अाणि सातारा जिल्ह्यातील काही पर्यटन केंद्रांची माहिती देण्यात अाली अाहे. यामुळे ही पत्रिका अाकर्षक झाली अाहेच मात्र त्यातून बरीचशी माहितीही लोकांपर्यंत पोहचत अाहे.

First published: April 15, 2017, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading