Home /News /news /

अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून आदिवासी संतापला; उचललं धक्कादायक पाऊल

अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून आदिवासी संतापला; उचललं धक्कादायक पाऊल

उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise department) त्रासाला कंटाळून एका आदिवासी व्यक्तीने आत्महत्या (Suicide) करण्यासाठी उच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    कोरबा, 24 फेब्रुवारी: उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise department) त्रासाला कंटाळून एका आदिवासी व्यक्तीने आत्महत्या (Suicide) करण्यासाठी उच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती संपूर्ण गावात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. काही तासांच्या थरार नाट्यानंतर गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली. त्यानंतर त्याला सुखरूप खाली उतरवण्यात यश आलं आहे. यावेळी या तारांतून विजेचा प्रवाह वाहत होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचं नाव दुजराम बिंझवार असून तो नकटीखार या गावचा रहिवाशी आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला कारवाईची धमकी दिल्याने त्याने आत्महत्या करण्यासाठी उच्च दाबाच्या विजेच्या टॉवरवर चढला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून दहा हजार रुपयांची मागणी केली होती, असा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे. नकटीखार येथील रहिवाशी असणाऱ्या दुजराम बिंझवार याने स्वतःला पिण्यासाठी महुआ दारू बनवली होती. यावेळी उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याने त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच संध्याकाळपर्यंत 10 हजार रुपयांची पुर्तता न केल्यास कारवाई करण्याची धमकीही या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे संबंधित व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी उच्च दाबाच्या वीजवाहक टॉवरवर चढला होता. हे ही वाचा-पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं;पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल दुजरामची टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच पोलीस, सरपंच आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि या सर्वांनी त्याची समजूत काढली. पण बराच काळ तो खाली उतरायला तयार नव्हता. पण काही तासांच्या जीवघेण्या नाट्यानंतर तो टॉवरवरून खाली आला. तेव्हा कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला. उच्च दाबाच्या टॉवरवर दुजरामची एक छोटी चुकही त्याच्या जीवावर बेतणारी होती. या हाय व्होल्टेज विद्युत वाहिन्यांतून दुजराम सुरक्षितपणे खाली आल्यामुळे हा चमत्कार झाल्याची भावना ग्रामस्थानी व्यक्त केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chhattisgarh, Crime news

    पुढील बातम्या