भ्रष्टाचारावर सरकारचा पुन्हा वार, आणखी 22 अधिकाऱ्यांना दिली सक्तीची निवृत्ती

भ्रष्टाचारावर सरकारचा पुन्हा वार, आणखी 22 अधिकाऱ्यांना दिली सक्तीची निवृत्ती

लोकहिताचे मुलभूत अधिकार नियम '56 J' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : प्रशासनातील भ्रष्टाचारावर आघात करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने कडक धोरण अवलंबलं आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे गंभीर आरोप असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे. त्यानुसार, सरकारनं नुकतंच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या (सीबीआयसी) 22 अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त्या दिल्या आहेत. यामध्ये अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकहिताचे मुलभूत अधिकार नियम '56 J' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे. जेव्हा पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून अशा कारवायांबाबत इशारा दिला होता. कर प्रशासनातील काही अधिकारी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना त्रास देऊन आपल्या ताकदीचा गैरवापर करीत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सरकारने नुकत्याच काही कर अधिकाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत होणारे भ्रष्ट व्यवहार सहन केले जाणार नाहीत, असं पंतप्रधान मोदी लाल यांनी किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना म्हटलं होतं.

इतर बातम्या - भरधाव ट्रकची दोन टेम्पोंना भीषण धडक, 15 जणांचा मृत्यू

यापूर्वी जून महिन्यात सरकारने भारतीय महसूल सेवेतील 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केलं होतं. यामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाच्या (सीबीडीटी) 12 अधिकाऱ्यांचा समावेश होता.

'तुम्ही मागितला तर अंगठाही देऊ, पण...' पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना शब्द

इतर बातम्या - राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

बीडमधील महाजनादेश यात्रेदरम्यान विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद पाहायला मिळाला. महाजनादेश यात्रा अडवून मेटेंनी हट्टानं मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत केलं. हे स्वागत होत असताना पंकजा मुंडे सत्काराला उपस्थित नव्हत्या. लोकसभा निवडणुकीत मेटेंनी पंकजा मुंडेंना उघड विरोध केला होता. मेटेंनी कार्यक्रम स्थळी जात असताना यात्रा जबरदस्तीनं अडवून स्वागत केलं. यानंतर मेटेंनी माईकवरून भाषणही केलं. गाडीच्या टपावर हे नाट्य घडत असताना पंकजा मुंढे यांचा खाली पारा प्रचंड चढलेला होता. या रागातच त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी अंगठा कापून द्यायला तयार आहे मात्र समोर अर्जुनच असला पाहिजे असं म्हटलं.

VIDEO: सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading