• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • IBNलोकमतच्या बातमीनंतर सरकारचं पेट्रोलवाढीचं केविलवाणं स्पष्टीकरण

IBNलोकमतच्या बातमीनंतर सरकारचं पेट्रोलवाढीचं केविलवाणं स्पष्टीकरण

राज्यात पेट्रोलवर ३ रुपये कर वाढवण्याचं समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकार करतंय.

  • Share this:
23 एप्रिल : राज्यात पेट्रोलवर ३ रुपये कर वाढवण्याचं समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकार करतंय. राज्याचे विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांनी काल एक निवेदन काढलंय. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानं राज्याच्या उत्पादनात घट झालीय आणि त्यामुळे पेट्रोलवरचा कर वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी म्हटलंय. आवश्यक गोष्टींच्या किमती वाढू नये म्हणून डिझेलवरचा व्हॅट वाढवू शकत नाही आणि म्हणून पेट्रोल महाग करावं लागलं, असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयाविरोधात आयबीएन लोकमतनं काल दिवसभर बातमी लावून धरली होती. त्यामुळे सरकारला हे पत्रक काढावं लागलं. पण प्रश्न हा आहे की तेलाच्या जागतिक किमतीत घट झाली तर त्याचा फायदा ग्राहकांना का मिळू नये ? म्हणजे दर वाढले तरी पेट्रोल महाग होणार आणि दर कमी झाले तर सरकार कर वाढवून ते महागच ठेवणार.
First published: