पेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे

पेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे

आरक्षण द्यायला विशेष अधिवेशन गरज नाही, सरकार असे ही देऊ शकते अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : मराठा समाज राज्यभरात आंदोलन करतोय. मी ही मराठा समाजाचाच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. सरकारही मराठा आरक्षण देऊ शकते, त्यात पेच येणार नाही अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे मांडली. तसंच आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण देण्यात आले होते याची अंमलबजावणीही करायची होती पण सरकार बदलल्यानंतर त्रुटी दाखवण्यात आली अशी टीकाही राणेंनी केली.

VIDEO : 'आरक्षणाची फाईल'वर पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या? पहा हा पूर्ण व्हिडीओ

मराठा संघटनेच्या सदस्यांनी आज नारायण राणेंची भेट घेतली. या भेटीसाठी शशिकांत जगताप, बाळासाहेब शिंदेंनी हे सकल मराठा मोर्चाचे सदस्य होते. मराठा आरक्षणाबाबत राणेंसोबत संघटनेच्या सदस्यांची चर्चा झाली. आणि अनावश्यक दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याची मागणीही केली. या बैठकीनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. जाळपोळ सुरू, सरकार ही आरक्षण वतीने प्रतिक्रिया देतात. आंदोलनाने हिंसक वळण घेतले ते थांबावे यासाठी मुख्यमंत्र्यांना मी भेटलो. सरकार हे आंदोलन थांबल्यास ठराविक महिन्यात करायला तयार आहे. राज्यात आंदोलन जे सुरू ते थांबावे ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं राणेंनी सांगितलं.

जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या - राज ठाकरे

तसंच आज काही संघटनाशी बोललो. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना यांना भेटून आरक्षण बाबत संघटना मागणी समोर ठेवेल असं आश्वासन राणेंनी दिलं.

भाजपवर टीका

 

29 जुलैला मराठा समाजाची बैठक, आंदोलनाबाबत घेऊ शकतात मोठा निर्णय

काँग्रेस काळात आरक्षण दिले आणि अंमलबजावणी सुरू झाले होते. सरकार बदल्यानंतर अहवाल त्रुटी असल्याचं म्हटलं गेले, त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय रखडला गेला. अशी टीकाही राणेंनी भाजपा सरकारवर केली.

संजय राऊतांना टोला

मराठा  आरक्षणावरून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या टीकेचा समाचार राणेंनी आपल्या शैलीत टोला लगावला. संजय राऊत ही काय आॅथेरिटी नाही, त्यामुळे ते काय बोलतात याचा काहीही फायदा नाही असा टोला राणेंनी लगावला. तसंच  शिवसेना घाबरते, मराठा आरक्षणाला सेनेचा कायम विरोध होता. तीव्र विरोध सुरू झाल्यावर सेना घाबरली आणि भूमिका बदली असंही राणे म्हणाले.

'विशेष अधिवेशनाची गरज नाही'

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मागणी केली होती.  पण आरक्षण द्यायला विशेष अधिवेशन गरज नाही, सरकार असे ही देऊ शकते अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 04:28 PM IST

ताज्या बातम्या