सरकारने ऑनलाइन औषधं विक्रीवर केली बंदी, काय आहे कारण?

सरकारने ऑनलाइन औषधं विक्रीवर केली बंदी, काय आहे कारण?

विक्रीवरील बंदी आदेश सर्व राज्यांमध्ये प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑनलाईन औषधं विकत घेता येणार नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : ऑनलाईन औषधे खरेदी करणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) परवाना नसलेल्या ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्यांवर बंदी घातली आहे. विक्रीवरील बंदी आदेश सर्व राज्यांमध्ये प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑनलाईन औषधं विकत घेता येणार नाहीत.

लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, नियामक एजन्सी ई-फार्मसीस संबंधित नियामक नियमांचा मसुदा तयार करुन जाहीर केला जात नाही. नियमांबाबत ई-फार्मेसींची नोंद शासनाकडे करावी आणि त्यांच्या डॉक्टर व रूग्णांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवली जावी असा प्रस्ताव आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, सीडीएससीओच्या स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, ई-फार्मेसीसंदर्भातील नियम व कायदे अजूनही चालू आहेत.

इतर बातम्या - Video Viral: शेपटीवरून गाडी नेल्यामुळे रागावला कोब्रा, पाठलाग करून बाईकवर बसला

डीसीजीआयचे प्रमुख व्ही.जी. सोमानी यांनी 28 नोव्हेंबर रोजी पत्र लिहून हा आदेश दिल्यानंतर या व्यवसायात पैशांची गुंतवणूक करणारे अनेक प्लॅटफॉर्म आता अडचणीत सापडले आहेत. डीसीजीआयने आपल्या पत्रामध्ये 12 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला आहे, डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर जहीर अहमद यांनी हा खटला दाखल केला होता. ई-फार्मेसीना ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स (डी अँड सी) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ई-फार्मेसीना परवान्या नसल्यामुळे औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

इतर बातम्या - हैदराबाद प्रकरण: आरोपीचा झाला होता प्रेम विवाह, पत्नी 7 महिन्याची गर्भवती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Dec 4, 2019 04:50 PM IST

ताज्या बातम्या