डोंबिवलीतील 27 गावांबद्दल महाविकास आघाडी सरकारने केली मोठी घोषणा

डोंबिवलीतील 27 गावांबद्दल महाविकास आघाडी सरकारने केली मोठी घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्या करीता भूमीपुत्र आणि संघर्ष समितीने गेले 5 वर्ष लढा दिला होता.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या डोंबिवलीतील 27 गावांचा निर्णय अखेर महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.  अखेर 27 गावांपैकी 18 गावांना कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उर्वरीत 9 गावं ही केडीएमसी पालिकेत राहणार आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्या करीता भूमीपुत्र आणि संघर्ष समितीने गेले 5 वर्ष लढा दिला होता. याबद्दल मागील काही दिवसांपासून हालचालींना वेग आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 गावांबद्दल बैठक घेतली होती. तसंच प्रशासनाकडून 27 गावांबद्दल ना हरकत आणि सुचनांसाठी लोकांना आवाहन केलं होतं. अखेर, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी डोंबिवलीतील 27 गावांपैकी 18 गावं वगळण्याचा निर्णय घेतला. यातील उर्वरीत 9 गावं ही केडीएमसी पालिकेतच राहणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेतील 27 गावांपैकी बहुंताश शीळ-कल्याण रस्त्याच्या पश्चिमेस असणारी आजदे, सागाव,नांदविली पंचानंद, धारिवली, संदप,उसरघर, काटई, भोपर आणि देसलेपाडा या 9 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे केडीएमसी पालिकेत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उर्वरीत 18 गावं घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा आणि कोळे या 27 गावांना महापालिकेतून वगळण्यात आलं असून लवकरच स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे.

First published: March 14, 2020, 7:16 PM IST
Tags: dombivali

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading