S M L

'जन-गण-मन' म्हणण्यास मौलवीचा विरोध, VIDEO व्हायरल

या मदरश्यांमध्ये 15 आॅगस्टला राष्ट्रध्वज फडकावला जातो. पण यावेळी एका मौलवीने राष्ट्रगीत म्हणून दिलं नाही

Updated On: Aug 22, 2018 11:07 PM IST

'जन-गण-मन' म्हणण्यास मौलवीचा विरोध, VIDEO व्हायरल

उत्तरप्रदेश, 22 आॅगस्ट : भारताचा स्वातंत्र्य दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण यावेळी भारतीय तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हणणे बंधनाकारक आहे. हा नियम सर्व शाळांमध्ये शिकवलाही जातो. पण जर याच पालन केलं नाहीतर हा गुन्हा आहे असंही शाळेत आपल्या सांगितलं जात पण उत्तरप्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातील मदरसा याला अपवाद ठरलाय. या मदरश्यातील मौलवीने राष्ट्रगीताला विरोध केल्यामुळे वाद पेटलाय.

महाराजगंज येथील कोल्हुई क्षेत्रात मोठ्याप्रमाणात मदरसे आहे. या मदरश्यांमध्ये 15 आॅगस्टला राष्ट्रध्वज फडकावला जातो. पण यावेळी एका मौलवीने राष्ट्रगीत म्हणून दिलं नाही आणि कडाडून विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मौलवी तिरंगा ध्वज फडकावतो. पण राष्ट्रगीत जेव्हा सुरू होणार होते तेव्हा मौलवीने विरोध केला. राष्ट्रगीत हे आपले राष्ट्रीय गीत नाही. आपल्या सर्वांना 'सारे जहां से अच्छा' म्हटलं पाहिजे असं म्हणून विरोध केला. या वादानंतर राष्ट्रगीत म्हटलं गेलं नाही.

त्यामुळे येथील स्थानिक लोकांनी महाराजगंज पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण पोलिसांनी ही घटना आमच्या हद्दीत येत नाही असं उत्तर देऊन टाळलं. मात्र, अल्पसंख्याक कल्याण अधिकारी आणि बीएसएला चौकशीचे आदेश दिले आहे. अजून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सांगितल जात आहे.  स्वत:एसएसपी शुक्ला यांनीच या व्हिडिओमध्ये मौलवी याला विरोध करत असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी आता बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यातील मुख्य आरोपीचे नाव हे जुनैद आहे. जुनैदसह दोन जणांना अटक करण्यात आलीये. त्यांच्यावर राष्ट्रगीत थांबवणे अधिनियम कलम 2 आणि 3, 7 सीएलए आणि कलम 7 आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींची चौकशी सुरू आहे.

PHOTOS : नवी दुचाकी, सेल्फी आणि एका कुटुंबाचा करूण अंत

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 11:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close