Google च्या स्मार्टफोनवर 21000 ची सूट; 'हा' ठरणार सर्वात स्वस्त गुगल फोन

Google च्या स्मार्टफोनवर 21000 ची सूट; 'हा' ठरणार सर्वात स्वस्त गुगल फोन

एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपर्यंत चालते फोनची बॅटरी

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : Google चा लेटेस्ट स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3aXL या दोन्ही स्मार्टफोनची 15 मे पासून विक्री सुरू झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवरून ऑनलाइन खरेदी करता येतील. Google Pixel 3A या स्मार्टफोनची किंमत भारतात 39,999 रुपये आहे. तर Pixel 3aXL ची किंमत 44,999 रुपये आहे. ऑनलाइन खरेद करताना एक्सचेंज ऑफर आणि EMI ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येईल. फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोनवर 21,000 रुपयांची भारी एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तसंच प्रत्येक महिन्याला 1495 रुपये EMI भरूनसुद्धा तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

गुगलचा हा फोन खरेदी करताना पेमेंटसाठी जर तुम्ही HDFC कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल. नव्या Pixel स्मार्टपोनसोबत 3 महिन्यांचा YouTube Music Premium अगदी फ्री मध्ये दिलं जाणार आहे. याशिवाय Pixel युजर्सना गुगलवर अनलिमिटेड हाय क्वॉलिटी स्टोअरेजचंसुद्धा ऑप्शन मिळेल. म्हणजेच तुम्हाला हवं तितके फोटो तुम्ही गुगलवर सेव्ह करू शकता.

Flipkart वर Big Shopping Days Sale सुरू; बम्पर डिस्काउंटमुळे अर्ध्या किमतीत मिळतील 'या' वस्तू

फीचर्स - Pixel 3a मध्ये अॅडाप्टिव बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्ज म्हणजेच एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपर्यंत या फोनची बॅटरी चालते. या स्मार्टफोनसोलत 18w चं चार्जर कंपनी देत आहे. तर 15 मिनिटे हा फोन चार्जकेला तर किमान 7 तासापर्यंत याची बॅटरी चालते. Pixel 3a मध्ये कॉल स्क्रीनिंगचंसुद्धा ऑप्शन देण्यात आलं आहे.

उद्यापासून सुरू होतोय OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा ऑनलाइन सेल; इथे मिळेल ऑफर

डिस्प्ले, कॅमेरा आणि स्टोअरेज - या फोनच्या डिस्प्लेबाबत सांगायचं झालं तर, Pixel 3a मध्ये 5.6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Pixel 3aXL ला 6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Pixel 3a या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर आहे. तर 4GB RAM आणि 64GB चं स्टोअरेज देण्यात आलं आहे.

First published: May 15, 2019, 7:40 PM IST
Tags: Flipkart

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading