फक्त 15 मिनिटे चार्ज केला तर इतके तास चालेल 'हा' स्मार्टफोन; अशी आहेत फीचर्स आणि किंमत

फक्त 15 मिनिटे चार्ज केला तर इतके तास चालेल 'हा' स्मार्टफोन; अशी आहेत फीचर्स आणि किंमत

फ्लिपकार्टवर सुरू झालंय प्री-ऑर्डर बुकिंग, 15 मे पासून सुरू होणार विक्री

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : Google चा लेटेस्ट स्मार्टफोन Pixel 3a आणि Pixel 3a XL हे दोन्ही स्मार्टफोन नुकतेच लाँच झाले. ही दोन्ही स्मार्टफोन 15 मे पासून भारतात उपलब्ध होतील. भारतात Google Pixel 3A या स्मार्टफोनची किंमत 39,999 आणि Pixel 3aXL ची किंमत 44,999 रुपये अशी राहणार आहे.

Google Pixel 3A या स्मार्टफोनचं प्री-ऑर्डर बुकिंग 8 मे पासूनच फ्लिपकार्टवर सुरू झालं असून, 15 मे पासून त्याची विक्री सुरू होणार आहे. Pixel 3a या स्मार्टफोनमध्ये त्यास अनुकूल अशी बॅटरी देण्यात आली आहे. जी एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपर्यंत चालेल. यासाठी कंपनीकडून 18w चं चार्जर दिलं जाणार आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, तुम्ही फक्त 15 मिनिटे हा फोन चार्ज केला तर 7 तासांपर्यंत त्याची बॅटरी चालेल. Pixel 3a मध्ये कॉल स्क्रीनिंगचं ऑप्शनसुद्धा देण्यात आलं आहे.

 

असे आहेत फीचर्स - Pixel 3a – या स्मार्टफोनची स्क्रीन साइज आणि बॅटरी जरा वेगळी आहे. यात 5.6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले आणि 3,000 mAh ची बॅटरी तसंच तर यात क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 670 प्रोसेसर देण्यात आलं आहे. Pixel 3aXL - या स्मार्टफोना 6 इंचाचा FHD gOLED डिस्प्ले आणि 3,700 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 4GB RAM आणि 64GB चं स्टोअरेज देण्यात आलं आहे.

First published: May 11, 2019, 6:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading