फोल्डेबल आणि 5G साठी गुगलने आणली नवी सिस्टीम; 2 अब्ज अँड्रॉइड फोनधारकांना मिळणार फायदा

फोल्डेबल आणि 5G साठी गुगलने आणली नवी सिस्टीम; 2 अब्ज अँड्रॉइड फोनधारकांना मिळणार फायदा

लवकरच 13 ब्रँडेड कंपन्यांच्या 21 स्मार्टफोनमध्ये पहायला मिळणार 'ही' सिस्टीम

  • Share this:

नवी दिल्ली, 8 मे : गुगलने Android Q ही नवी Android Operating System लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. फोल्डेबल आणि 5G टेक्नॉलजीच्या फोनसाठी डेव्हलप करण्यात आलेली ही सिस्टिम लवकरच 13 ब्रँडेड कंपन्यांच्या 21 स्मार्टफोनमध्ये पहायला मिळणार आहे. 'Android Q' हे अँड्रॉइट ऑपरेटिंग सिस्टिमचं 10 वं व्हर्जन असून, जगभरातील जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये ती आणण्याचं काम सद्या सुरू असल्याची माहिती आहे.

मल्टीटास्किंग एक्सपीरियंस आणि वेगवेगळ्या स्क्रीन डायमेंशन्सला सहज अडॉप्ट करण्याच्या उद्देशाने ही सिस्टिम डिझाइन करण्यात आली आहे. यामुळे मोबाइल विश्वातल्या अनेक गोष्टी भविष्यात सोप्या होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

जगात ऐकायला न येणाऱ्या आणि कमी ऐकू येणाऱ्यांची संख्या जवळपास 46.6 दशलक्ष आहे. प्रत्येक प्रकारचा मजकूर सामान्यांप्रमाणेच त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल अशी फिचर्स गुगलच्या या सिस्टीममध्ये राहणार असल्याचं कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. प्रत्येक युजरला डिजिटल मीडियाचा लाभ घेता येईल या दृष्टीकोनातून ही सिस्टिम डेव्हलप करण्यात आली असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

लाइव कॅप्शन्स वीडियो, पॉडकास्ट आणि ऑडियो मॅसेजसाठी ही सिस्टिम प्रभावी ठरणार आहे. विशेष बाब अशी की, या सिस्टिमच्या मोबाइलमध्ये वाय-फायची आणि मोबाइल डेटाची गरज राहणार नाही. ऑफलाइन असतानाही तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकाल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2019 06:38 PM IST

ताज्या बातम्या