गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक

गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक

भारतीयांनी 2018 मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या 'या' गोष्टी

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : भारतीय लोकं लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक असल्याचं गुगलने म्हटलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून 2018 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर गुगले ही बाब स्पष्ट केली आहे. गुगलच्या 'ईयर इन सर्च-इंडिया: इनसाइट्स फॉर ब्रँड्स' या रिपोर्टमध्ये ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

गुगलच्या या रिपोर्टनुसार, 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये गुगलच्या माध्यमातून अनुरूप स्थळ शोधणाऱ्या भारतीयांमध्ये 13 टक्के, तर डेटिंगसाठी पार्टनर शोधणाऱ्या भारतियांमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. यावरून भारतीय लोकं लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक असल्याचं गुगने म्हटलं आहे.


तुमच्या स्मार्टफोन्सवरून Block करा नको असलेले कॉन्टॅक्ट नंबर; 'या' आहेत स्टेप्स


2017 च्या तुलनेत 2018 मध्ये भारतात लग्नासाठी अनुरूप स्थळं शोधणाऱ्यांच्या तुलनेत डेटिंगसाठी सर्च करणाऱ्यांचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. यात शहरातल्या लोकांनी महानगरांनासुद्धा मागे टाकलं आहे. ज्या वेगाने भारतीयांमध्ये डेटिंगची क्रेझ वाढत आहे ती पाहता पुढल्या काही वर्षात 'लाइफ-पार्टनर' शोधण्याचा ट्रेंड मागे पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसंच, 'Near Me’ असं सर्च करणाऱ्यांचं प्रमाण 75 टक्क्यांनी तर को-वर्किंग स्पेसेस असं सर्च करण्याचं प्रमाण 100 टक्क्यांनी वाढलं असल्याचं गुगलच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. दरवर्षी सरासरी चार कोटी भारतीय इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. महानगरांच्या तुलनेत शहरांमध्ये ऑनलाईन सर्च करण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. भारतातील शहरांमध्ये राहणारे लोकं वीमा, सौंदर्य आणि पर्यटन असे विषय सर्च करत आहेत.


या 'चंद्रा'चे तुकडे-तुकडे करणार नासाचं रॉकेट


भारत हा जगात सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरणार देश - गुगलचे भारतातले राष्ट्रीय संचालक विकास अग्निहोत्री सांगतात की, ''भारतात याआधी ऑनलाईन स्पेस कधीच एवढी सक्रीय नव्हती. भारत हा जगात सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरणार देश बनला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भारतियांच्या आकांक्षा उंचावल्या आहेत. ऑनलाईन व्हिडिओचं वाढता प्रभाव, भाषेचा आणि आवाजाचा उपयोग करणाऱ्यांमध्ये वृद्धि झाली आहे.”


हिंदीत सर्च करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं - क्षेत्रीय भाषेत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. भारतात 2021 पर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून तीन चर्तुथांश लोकं क्षेत्रीय भाषेचा प्रयोग करतील अशी शक्यता या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर हिंदी भाषेत सर्च करणाऱ्यांची संख्या संख्या ही 2017 च्या तुलनेत दुप्पट वाढली असल्याचं सांगण्यात आलं आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या