मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Googleचं यूजर्सना खास गिफ्ट, 15GB ऐवजी मिळेल 1TB स्टोरेज, वाचा संपूर्ण माहिती

Googleचं यूजर्सना खास गिफ्ट, 15GB ऐवजी मिळेल 1TB स्टोरेज, वाचा संपूर्ण माहिती

Googleचं यूजर्सना खास गिफ्ट, 15GB ऐवजी 1TB स्टोरेज मिळेल, वाचा संपूर्ण माहिती

Googleचं यूजर्सना खास गिफ्ट, 15GB ऐवजी 1TB स्टोरेज मिळेल, वाचा संपूर्ण माहिती

गुगल वर्कस्पेस वापरणाऱ्या युजर्सना आता 15 GB स्टोरेजऐवजी 1TB सिक्युअर क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. विशेष म्हणजे जुन्या युजर्सनाही ही सुविधा उपलब्ध होणार असून, याकरिता युजर्सना फार विशेष काही करण्याची गरज नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 1 नोव्हेंबर: गुगलने युजर्ससाठी सर्चिंग व्यतिरिक्त अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात प्रामुख्याने जीमेल, भाषांतरासाठी गुगल ट्रान्सलेट, ऑनलाइन मीटिंगसाठी मीट आदींचा समावेश आहे. गुगल सातत्याने या सुविधा अपडेट करत असतं. गुगलने आपल्या युजर्सना नुकतीच एक खास भेट दिली आहे. गुगल वर्कस्पेस वापरणाऱ्या युजर्सना आता 15 GB स्टोरेजऐवजी 1TB सिक्युअर क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. विशेष म्हणजे जुन्या युजर्सनाही ही सुविधा उपलब्ध होणार असून, याकरिता युजर्सना फार विशेष काही करण्याची गरज नाही. अगदी सहजपणे युजर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या व्यतिरिक्त वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल युजर्ससाठी गुगल आणखी काही फीचर्स आणणार आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

    गुगल कंपनीने वर्कस्पेस युजर्ससाठी स्टोरेज क्षमता वाढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यानुसार, येत्या काळात गुगल वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल अकाउंट होल्डरना 15GB ऐवजी 1TB सिक्युअर क्लाउड स्टोरेज उपलब्ध होणार आहे. या फीचरसाठी युझरला सेटिंगमध्ये बदल करण्याची गरज नाही. सर्व गुगल अकाउंट ऑटोमॅटिक 15 GB स्टोरेज ऐवजी 1TB स्टोरेजमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत, अशी माहिती गुगलने एका ब्लॉगपोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या शिवाय गुगल वर्कस्पेस इंडिव्हिज्युअल युजर्ससाठी आणखी काही फीचर्स आणले जातील, असेही कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    हेही वाचा: Chinese Loan Apps: ‘या’ चिनी अ‍ॅप्सनी घेतला अनेक भारतीयांचा बळी, सरकारनं उचललं कडक पाऊल

    जगभरात आठ दशलक्ष युजर्स गुगल वर्कस्पेससाठी गुगलला पैसे देत आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांत दोन दशलक्ष ग्राहक जोडले गेले आहेत. कोरोना काळात रिमोट वर्क सुरू होतं. त्यामुळे या कालावधीत युजर्सची संख्या लक्षणीय वाढली आहे. जर तुम्ही गुगल वर्कस्पेसचा वापर करत नसाल तर तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही. गुगल वर्कस्पेस वापरण्यासाठी तुम्हाला कंपनीकडून सब्सक्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. या प्लॅनची किंमत 125 रुपये प्रतिमहिनापासून सुरू होते. गुगल वर्कस्पेस आता दुसऱ्या देशांमध्येदेखील उपलब्ध करून दिलं जात आहे. गुगल वर्कस्पेस (पूर्वीचं GSuite) एक क्लाउड बेस्ड प्रॉडक्टिव्हिटी सूट आहे. यामुळे इंडिव्हिज्युअल युजर्स आणि ऑफिस टीमला कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही डिव्हाइसवरून काम करण्याची सुविधा मिळते.

    गुगल ड्राइव्ह आता अधिक सुरक्षित असेल. कारण कंपनी युजर्सच्या सुरक्षेसाठी इनबिल्ट प्रोटेक्शन फीचर देणार आहे. यामुळे युजर्सचा डाटा मालवेअर, स्पॅम आणि रॅन्समवेअरपासून सुरक्षित राहणार आहे. स्टोरेज अपग्रेड करण्यासाठी युजर्सना सेटिंगमध्ये कोणताही बदल करावा लागणार नाही. कंपनी ऑटोमॅटिकली युजर्सचं स्टोरेज 1TB पर्यंत वाढवणार आहे. यासाठी युजर्सकडे केवळ गुगल वर्कस्पेसचं अकाउंट असणं गरजेचं आहे.

    दरम्यान, "मल्टी सेंड मोड फीचर्सदेखील लवकरच लॉंच करण्यात येणार आहे. यामुळे युजर्स अनेक रेसिपेंट्सला अगदी सहजपणे मेल करू शकतील. न्यूजलेटर आणि सूचना पाठवण्यासाठी हे फीचर एक उत्तम पर्याय ठरेल," असं कंपनीनं म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Google