गुगलकडून 'बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे केला कार्याला सलाम

गुगलकडून 'बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे केला कार्याला सलाम

मुरलीधर देवदास आमटे नावाने परिचित असलेले आमटे आपल्या समाजकार्यामुळे आणि कुष्ठरोग्यांच्या सेवाव्रतामुळे जगाचे बाबा आमटे बनले.

  • Share this:

मुंबई, २६ डिसेंबर २०१८- कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या बाबा आमटेंची आज 104 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचं कौतुक करताना गुगलने गुगड डुडलच्या माध्यमातू त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. बाबा आमटेंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांना गुगलने आदरांजली वाहिली आहे. गुगलने बाबांच्या पाच छायाचित्रांचा एक स्लाईड शो बनविला आहे. त्याद्वारे बाबांच्या समाजकार्याची महती जगाला दाखवून गुगलने बाबा आमटेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

26 डिसेंबर 1914 मध्ये विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बाबा आमटेंचा जन्म झाला होता. मुरलीधर देवदास आमटे नावाने परिचित असलेले आमटे आपल्या समाजकार्यामुळे आणि कुष्ठरोग्यांच्या सेवाव्रतामुळे जगाचे बाबा आमटे बनले. 1985 मध्ये बाबांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो आंदोलन केले होते. देशात एकात्मतेचा संदेश देणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाबांनी हे आंदोलन केले होते.

India vs Australia 3rd Test- मयंक अग्रवालची फलंदाजी पाहायला सकाळी ५ वाजताच उठली बॉलिवूडची 'ही' स्टार

बाबा आमटेंनी एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिलं. त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येतं होतं. तेव्हा त्या कुष्ठरोग्याच्या जागी मी असतो तर असा विचार बाबांनी केला. त्याक्षणी बाबा त्या व्यक्तीला घेऊन घरी गेले आणि त्याची सुश्रूशा केली. या घटनेनंतर त्यांनी आजन्म कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा पण केला. चंद्रपुरात कुष्ठरोग्यांना आपलं म्हणणारा आनंदवन हा आश्रम त्यांनी सुरु केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा प्रमुख सहभाग होता.

उद्धव ठाकरे यांची मोदींवरील टीका भाजपच्या जिव्हारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

दरम्यान, बाबा आमटेंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना युनाइटेड नेशन्सचाही अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. ९ फेब्रुवारी २००८ मध्ये आनंदवन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सुरु केलेलं आनंदवनचं कार्य पुढे त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास आमटे यांनी सुरू ठेवले.

VIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट

First published: December 26, 2018, 12:21 PM IST

ताज्या बातम्या