गुगलने खास डुडलद्वारे 'महिला दिना'च्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

गुगलने खास डुडलद्वारे 'महिला दिना'च्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा

महिलांचा सन्मान करण्यासाठी गुगल डुडलद्वारे खास शुभेच्छा

  • Share this:

मुंबई, 7मार्च :  'जागतिक महिला दिन' आज सर्वत्र जल्लोषात साजरा केला जात आहे. महिला सशक्तीकरण आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्चला हा दिवस साजरा केला जातो. या खास दिनानिमित्त गुगलनं विशेष डुडलच्या माध्यमातून महिलांना वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलनं डुडल स्लाइडद्वारे महिलांप्रति असलेला आदर व्यक्त केला आहे.

सर्च इंजन गुगलनं (Google) 14 स्लाइडच्या माध्यमातून 14 भाषांमध्ये प्रेरणादायक आणि महिला सशक्तीकरणासंदर्भातील प्रख्यात व्यक्तिमत्त्वाचे विचार मांडत महिला दिनाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलला भेट दिल्यानंतर डुडल स्लाइडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे विचार दिसतील. विशेष म्हणजे प्रख्यात महिला व्यक्तिमत्त्वांचेच विचार या स्लाइडमध्ये मांडण्यात आले आहेत. या स्लाइडमध्ये भारतीय बॉक्सर मेरी कोमचाही समावेश आहे.

8मार्चला का साजरा केला जातो जागतिक महिला दिन?

1909 पर्यंत महिला दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जात होता. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा करण्यात आला होता. ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस 'जागतिक महिला दिन' साजरा केला जायला हवा, असे ठरवण्यात आले. पण त्यावेळी यासंबंधीचा दिवस निश्चित करण्यात आला नव्हता. त्यानंतर 1914 मध्ये पहिल्यांदा 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडण्यात आला होता. पण त्यानंतर 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

वाचा अन्य बातम्या :

Women's Day: अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेतात या अभिनेत्री, स्वतःच्या नावावर हिट करतात सिनेमा

Women's Day: लष्करात आता महिलांना मिळणार ही मोठी संधी

Women's Day: आता स्त्रीयांनी अती डाएट करायला नको- मृणाल दुसानीस

First published: March 8, 2019, 7:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading