नवी दिल्ली, 2 मे : माहितीचा खजिना असलेलं गुगल तुमची हरवलेली वस्तूसुद्धा शोधून देऊ शकतं. हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. गुगल अॅपच्या माध्यमातून हे शक्य असल्याची एक घटना दिल्ली येथे समोर आली. घटनेची माहिती मिळताच एका बीट कॉन्स्टेबलने गुगल अॅपच्या माध्यमातून अवघ्या 15 मिनिटांत मोबाईल चोरणारी महिला पकडल्या गेली.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुवर्णा या 'अरुणा आसफ अली हॉस्पीटल'मध्ये कामाला आहेत. बुधवारी जेव्हा त्या रुग्णांना तपासण्यासीठी ओपीडीमध्ये गेल्या तेव्हा त्यांची बॅग आणि मोबाईल कुणीतरी लंपास केली. हे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच बीट कॉन्स्टेबलने आपल्या मोबाईलवर 'गूगल फाइंड माय डिवाइस' हे अॅप डाउनलोड केलं आणि चोरीला गेलेल्या मोबाईलचं लोकेशन सर्च केलं. हे करत असताना त्यांनी CCTV कॅमेऱ्यात काही महिलांचे चेहरेसुद्धा बघीतले आणि डॉ. सुवर्णा यांच्यासह त्यांनी गुगल अॅप दाखवत असलेल्या लोकेशनकडे धाव घेतली. जेव्हा ते तीस रजारी कोर्टाजवळ पोहोचले, तेव्हा एक संशयास्पद महिला त्यांना फिरताना दिसली, जीला डॉ. सुवर्णा यांनी ओळखलं. ताब्यात घेताच तिच्याकडून डॉ. सुवर्णा यांची बॅग आणि मोबाईल जप्त करण्यात आला. गुगल अॅपच्या माध्यमातून अवघ्या 15 मिनिटांत पकडल्या गेलेली 35 वर्षीय महिला ही जाफराबाद येथील रहिवासी असून, तिचं नाव शबाना असं आहे.