अँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर?, गुगल म्हणतंय...

1800-300-1947 हा नंबर अँड्रॉईड मोबाईल्समध्ये अचानक दिसू लागला

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2018 11:57 PM IST

अँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर?, गुगल म्हणतंय...

नवी दिल्ली, 04 आॅगस्ट : यूआयडीएआय हेल्पलाईन क्रमांकच्या नावाखाली अनेकांच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये एक नंबर अचानक सेव्ह झाल्यानं शुक्रवारी खळबळ उडाली होती. ही चूक गूगलची असल्याचं समोर आलंय. गूगलनं त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केलीय. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवरून हा नंबर हटवणं राहून गेल्याचं गूगलनं म्हटलंय. या नंबरशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. 2014 मध्ये हा नंबर गूगलनं अँड्रॉईड ऑपआता ही चूक मान्य करत गूगलनं संबंधित नंबर डिलीट करण्याचं आवाहन केलंय.

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (यूआयएडीआय) यावर खुलासा करताना स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीला हेल्पलाइन नंबर युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फीड करण्यास सांगितले नाही. त्यामुळे हा हेल्पलाइन नंबर कसा काय आला, याची सोशल मीडियावर चर्चा आहे. फोनबुकमध्ये जो नंबर सेव्ह झाला, तो १८००-३००-१९४७ असा आहे. हा हेल्पलाइन नंबर जुना असल्याचे यूआयडीएआयने स्पष्ट केले. नवा टोल फ्री-नंबर १९४७ हा आहे.

नेमकं काय झालं?

- 1800-300-1947 हा नंबर अँड्रॉईड मोबाईल्समध्ये अचानक दिसू लागला

- हा नंबर चुकीचा आणि कालबाह्य असल्याचं यूआयडीएआयनं स्पष्ट केलं होतं

- 2014 मध्ये गूगलनं हा नंबर अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमध्ये अॅड केला होता

- पण सिस्टिमवरून नंबर हटवणं राहून गेल्याचं गूगलनं म्हटलंय

- अँड्रॉईडच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये हा नंबर हटवण्यात येईल - गुगल 

हेही वाचा

आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!

विराटचं शतक वाया, इंग्लंडचा 31 धावांनी विजय

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 11:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close