Home /News /news /

पुणेकरांसाठी GOOD NEWS, कोरोनाची नवीन माहिती आली समोर!

पुणेकरांसाठी GOOD NEWS, कोरोनाची नवीन माहिती आली समोर!

गेल्या दीड महिन्याच्या संघर्षानंतर पुण्यातून आता दिलासादायक चित्र समोर आले आहे.

पुणे, 07 मे: जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, गेल्या दीड महिन्याच्या संघर्षानंतर पुण्यातून आता दिलासादायक चित्र समोर आले आहे. पुण्यात तब्बल दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर कोरोना रूग्ण संख्यावाढीचा आलेख आता कमी होत आहे. एवढंच नाहीतर तर कोरोनावर मात करून बरे होण्याच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज किमान 50 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येचं प्रमाणही 86 टक्क्यांवरून 65 टक्क्यांवर आलं आहे, अशी माहिती  पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांनी न्यूज18 लोकमतला  दिली. पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या आता दोन हजारांच्यावर पोहोचली आहे. दररोज वाढणाऱ्या रूग्णसंख्येत गेल्या तीन दिवसांपासून मोठी घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी पुण्यात दररोज सरासरी शंभराच्यावर नवे रूग्ण सापडत होते. आता मात्र हे प्रमाण 60 ते 70 पर्यंत खाली आलं आहे. तसंच पुण्यात रुग्ण आढळल्यापासून ते 6 मेपर्यंत यात कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांची आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार,  २८ एप्रिल रोजी 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर हा आलेख हळूहळू वाढत गेला. आता एका महिन्याच्या कालावधीनंतर ही संख्या आता दुपट्ट झाली आहे. 6 मे रोजी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 587 इतकी नोंद झाली आहे. थोडक्यात गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील कोरोना रूग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे. पुण्यात आजपासून दुकाने उघडण्यास परवानगी दरम्यान,  पुण्यात  प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळात अत्यावश्यक गोष्टींची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय इतर दुकानांनाही ठरलेल्या दिवशी उघडायला परवानगी मिळाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच दुकानं उघडण्यास दुकानदारांना परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, 1 किमी परिक्षेत्रात एका प्रकारचं एकच दुकान सुरू ठेवता येईल. पुण्यात प्रशासनाने 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केली आहेत. तिथे मात्र, फक्त 10 ते 2 या वेळात दूध, किराणा वगैरे आवश्यक सेवांची दुकानंच उघडी राहतील. बाकी परिसर बंद राहील.इतर सर्व भागातली दुकाने 12 तास खुली राहणार आहे. सरकारने या आधीच सर्व दुकानांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. हेही वाचा -गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना! विशाखापट्टणममधून समोर आले 10 धक्कादायक PHOTO मध्यवर्ती पुण्यातल्या लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड तसंच कोंढव्यातला एनआयबीएम रोड यावरची कुठलीही दुकानं उघडायला मनाई आहे. छोट्या गल्ली आणि रस्त्यांवरची दुकानं एका किलोमीटरच्या परिसरात एका प्रकारचं एकच दुकान या नियमानं उघडायला परवानगी देण्यात आली आहे. व्यापारी संकुल, मॉल बंदच राहतील. पण कंनेन्मेंट झोन नसेल तर सोसायट्यांमधली छोटी दुकानं उघडायला परवानगी दिली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या