10 लाख बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

10 लाख बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव कालावधीत 2 हजार रुपयाच्या अर्थसहायाचा पहिला हप्ता एप्रिल 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै 2020 पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली आहे यासाठी मंडळाने 183 कोटी रुपये खर्च केले आहेत.

मोदींचं आत्मनिर्भर भारताचं या क्षेत्रात स्वप्न झालं पूर्ण; आता जगाला करतो पुरवठा

सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तर इमारत व इतर बांधकाम अद्यापही पूर्ववत सुरू झालेलं नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदीत बांधकाम कामगारांना 3 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

राष्ट्रवादीतील हालचालींबद्दल धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, भाजपला लगावला टोला

या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 14, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या