मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राजकारणात चांगले दिवस येवू शकतात, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचं सूचक विधान

राजकारणात चांगले दिवस येवू शकतात, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचं सूचक विधान

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा बद्दल गौरवोद्गार काढले होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा बद्दल गौरवोद्गार काढले होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा बद्दल गौरवोद्गार काढले होते.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 28 फेब्रुवारी : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा बद्दल गौरवोद्गार काढले होते. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया देत  राजकारणामध्ये चांगले दिवस येवू शकतात, असं वक्तव्य केलं आहे.

जळगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा होता. एका कार्यक्रमात बोलतांना सुप्रिया सुळे यांनी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले होते. यावर एकनाथ खडसे यांनी म्हणाले की, 'योग्य कामाची दखल घेतल्यास राजकारणामध्ये चांगले दिवस येवू शकतात' अशी प्रतिक्रिया दिली.

रक्षा खडसे आणि सुप्रिया सुळे  एकत्र संसदेत काम करतात, एकमेकांचे सहकार्य आहे. त्यामुळे स्वभाविक आहे  एकमेकांचा कामाचे कौतुक करत असताना राजकारण्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी हे कौतुक केले आहे. सुप्रिया ताईंनी चांगले काम केले. आम्ही त्यांचे नेहमी कौतुक केलं आहे, असंही खडसे म्हणाले.

'काही गोष्टी या राजकारण्याच्या पलीकडच्या असतात योग्य कामाची दखल घेतली पाहिजे. त्यात राजकारण आडवा येता कामा नये. त्याची जर दखल घेतली तर राजकारणामध्ये चांगले दिवस येवू शकतात' असं सूचक विधानही खडसेंनी केलं.

दरम्यान,  सुप्रिया सुळे या आज वक्ता नव्हे तर थेट वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. वृत्तनिवेदिका म्हणून सुप्रिया सुळे यांनी बातमी वाचली ते राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची. याबाबतचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे.

जळगावातल्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयातील "सेंटर फॉर मास मीडिया & फॉरेन लॅंग्वेज विभागातील व्हिडीओ स्टुडिओत सुप्रिया सुळे यांनी बातम्या सादर केल्या. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील अजित पवारांची प्रतिक्रिया याचा या बातमीत समावेश होता.

एकीकडे, सुप्रिया सुळे यांनी वृत्तनिवदेन करत बातम्या दिल्या तर दुसरीकडे जळगावातच त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला बांगड्या दाखवत निषेध करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका करताना बांगड्या घातल्याचा उल्लेख केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा निषेध करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला बांगड्या भरून निषेध करण्यात आला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिलांना बांगड्या भरत ह्या वाक्याचा निषेध केला. आम्ही महिला आहोत याचा आम्हाला गर्व आहे. म्हणून आम्ही बांगड्या भरत होतो, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

First published: