चाकूचे 3 वार आणि मैत्रीचा 'दी एन्ड', दोस्तानेच केली तरुणाची निर्घृण हत्या

चाकूचे 3 वार आणि मैत्रीचा 'दी एन्ड', दोस्तानेच केली तरुणाची निर्घृण हत्या

तरुणाची निर्घृणरित्या हत्या केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:

प्रविण तंडेकर, प्रतिनिधी

गोंदिया, 10 नोव्हेंबर : गोंदिया शहराच्या  मनोहर चौकात हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  रात्रीच्या सुमारास चायनिसच्या ठेल्यावर चायनिस खात असताना एक तरुणाच्या त्याच्या मित्राने हत्या केल्याचं समोर आलं आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना गोंदियामध्ये मात्र या हत्येने खळबळ उडाली आहे. तरुणाची निर्घृणरित्या हत्या केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कान्हा शर्मा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाची त्याच्याच मित्राने अचानक चायनिस ठेल्यावर येऊन चाकुने वार करत हत्या केली. मित्रानेच मित्राची चाकुने वार करत हत्या केल्याने गोंदीया शहरात शोककळा पसरली आहे. या हत्ये प्रकरणार दोन संशयित आरोपींना पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास गोंदीया शहर पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कान्हा हा चायनिजच्या दुकानावर खात होता. तिथे अचानक त्याचा मित्र आला आणि त्याने काहीही न बोलता कान्हावर चाकूने सपासप वार केले. चाकूने शरीरावर गंभीर इजा झाल्यामुळे कान्हाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. चायनिजच्या ठेल्यावर बऱ्यापैकी स्थानिकांची गर्दी होती. ऐन संध्याकाळी वर्दळीच्या वेळी अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

या हत्येची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कान्हाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पैशांवरून किंवा शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे कान्हाची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांच्या चौकशीनंतर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून आता प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

First published: November 10, 2019, 9:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading