गोमूत्र पार्टी पडली महागात, आजारी पडलेल्या स्वयंसेवकाची BJP नेत्याविरोधात तक्रार

गोमूत्र पार्टी पडली महागात, आजारी पडलेल्या स्वयंसेवकाची BJP नेत्याविरोधात तक्रार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने आयोजित केलेल्या गोमूत्र पार्टीत सर्वांना गोमूत्राचे वाटप करण्यात आले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : बुधवारी गोमूत्र पार्टीचे आवाहन करणाऱ्या एका भाजप (BJP) कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी या नेत्याने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं.

या गोमूत्र पार्टीत एक स्वयंसेवक आजारी पडला आहे. त्यामुळे या नागरिकाने भाजप नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की , उत्तर कलकत्त्याच्या जोरासाखो या भागात स्थानिक पार्टी कार्यकर्त्यांनी 40 वर्षीय नारायण चॅटर्जींनी सोमवारी एका गोशाळेत गो पूजा कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि याचवेळी त्यांनी गोमूत्राचे वितरणही केले होते.

हे वाचा - पुण्यातील हिंजवडी IT कंपन्यांकडून आदेशाचे उल्लंघन, वर्क फ्रॉम होम नाही

त्यांनी दुसऱ्यांना गोमूत्र देताना यातील चमत्कारिक गुणांविषयी सांगितले. यावेळी येथे ड्यूटी करणाऱा एक स्वयंसेवकाने गोमूत्र प्यायले. यामुळे मंगळवारी तो आजारी पडला. ज्यानंतर त्याने चॅटर्जीविरोधात तक्रार दाखल केली. यावर बंगाल भाजप महासचिव सायंतन बसू यांनी सांगितले की, चॅटर्जी यांनी गोमूत्राचे वितरण केले होते. त्यांनी कोणालाही गोमूत्र पिण्याची जबरदस्ती केली नव्हती.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना कोरोनाबाबत सजग राहण्याचं आवाहन केलं आहे.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- आपण निरोगी राहिलो तर जग निरोगी राहिल

- कोरोनाचा सामना करण्यासाठी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे

- गर्दीपासून साावध रहा, घराच्या बाहेर निघू नका

- जितकं शक्य आहे तितकं घरी राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढी कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा

First published: March 19, 2020, 9:00 PM IST
Tags: BJPcow

ताज्या बातम्या