नवी दिल्ली, 29 जून : सोन्याच्या किंमतीमध्ये आजही विक्रमी (Gold-Silver Price Today 29th June 2020) वाढ झाली आहे. जून महिन्यात तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमतीमध्ये इतिहास वाढ झाली आहे. सोमवारी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 366 रुपयांनी वाढून 48600 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (ibjarates.com) ची वेबसाइट सोन्या-चांदीची सरासरी किंमत अद्ययावत करत असते. त्यांच्यामते, 29 जून 2020 रोजी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट
आज 23 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 364 वाढून 48405 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत आता 336 वरून 44518 रुपयांना महाग झालं आहे. आणि 18 कॅरेटचे दहा ग्रॅमपर्यंत 36450 रुपये महाग झालं आहे. चांदीच्या दरातही 329 रुपयांची वाढ झाली आहे.
BREAKING : पंढरपूरला जाऊ द्या; वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्जा देशभरातील 14 केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शवितं. खोसला म्हणाले की, सध्याचा सोने-चांदीचा दर, स्पॉट किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते परंतु त्यांच्या किंमतींमध्ये थोडा फरक आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold rates today