Gold-Silver Rates: या कारणामुळे आज सोन्या-चांदीच्या भावात झाले बदल

Gold-Silver Rates: या कारणामुळे आज सोन्या-चांदीच्या भावात झाले बदल

बुधवारी दहा ग्रॅम सोन्याचा (सोन्याचा दर आज) दर 18 रुपयांनी वाढला तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 380 रुपये प्रतिकिलोंनी वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : भारत-चीनमध्ये सुरू असलेला तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली स्थिरता यामुळे आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate Today) थोडाफार बदल पाहायला मिळाला. बुधवारी दहा ग्रॅम सोन्याचा (सोन्याचा दर आज) दर 18 रुपयांनी वाढला तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 380 रुपये प्रतिकिलोंनी वाढ झाली आहे.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17 June 2020)

बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ झाली, त्यामुळ नवीन किंमत प्रति 10 ग्रॅम 48,220 रुपयांवर पोहोचली. पहिल्या दिवशी ही किंमत प्रति 10 ग्रॅम 48,202 रुपयांच्या पातळीवर थांबली.

चांदीचे नवे दर (Silver Price on 17 June 2020)

बुधवारी चांदीची किंमत 380 रुपयांनी वधारली. त्यामुळे एक किलो चांदीची किंमत 49,250 रुपयांवर पोहोचली. पहिल्या दिवशी 1 किलो चांदीची किंमत 48,870 रुपये होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर स्थिर राहिले.

का घसरल्या सोन्याच्या किंमती?

HDFC सिक्योरिटीचे सीनिअर एनलिस्ट (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे त्याचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या किंमती स्थिर आहेत.

सोन्याच्या ETFमध्ये वाढली गुंतवणूक

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) मध्ये स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांच्या दरम्यान 815 कोटींची गुंतवणूक झाली. कारण, लॉकडाऊनमुळे गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे मागच्या वर्षभरात इतर मालमत्तांपेक्षा या श्रेणीने उत्तम काम केलं आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 7:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या