दिवाळीसाठी सोन्याची खरेदी करण्याआधी जाणून घ्या हे नियम, नाहीतर येऊ शकते IT ची नोटीस

दिवाळीसाठी सोन्याची खरेदी करण्याआधी जाणून घ्या हे नियम, नाहीतर येऊ शकते IT ची नोटीस

सोन्याची खरेदी करणं किंवा विक्री करण्याबद्दलचे नियम बऱ्याच जणांना माहीत नसतात. सोन्याची खरेदी किंवा विक्री केली तर कर भरावा लागतो. त्यासाठीच जाणून घ्या हे नियम.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारतीयांना सोन्याची खरेदी करणं खूप आवडतं. दिवाळीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी करायची असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण सोनं खरेदी केल्यावर इनकम टॅक्सची नोटीस आली तर याच आनंदावर पाणी फेरलं जातं.

सोन्याची खरेदी करणं किंवा विक्री करण्याबद्दलचे नियम बऱ्याच जणांना माहीत नसतात. सोन्याची खरेदी किंवा विक्री केली तर कर भरावा लागतो.

जाणून घेऊया या नियमांबद्दल

1. केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया सांगतात, सोनं हे रोकड पैसे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून आपण पैसे भरू शकतो. GST लागू झाल्यानंतर ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करताना घडणावळीचे पैसे द्यावे लागतात. त्याशिवाय सोन्याच्या एकूण किंमतीच्या 3 टक्के पैसे द्यायचे असतात.

2. जेव्हा सोन्याची विक्री करायची असते तेव्हाही सोन्यावर कर भरावा लागतो. तुम्ही स्वत:कडे किती सोनं ठेवलं त्यावर हा कर अवलंबून असतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन्सच्या आधारे हा कर भरावा लागतो.

(हेही वाचा : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क)

3. एखाद्या दागिन्याची खरेदी केल्यानंतर तुम्ही 3 वर्षांच्या आत त्याची विक्री केलीत तर त्याच्या वाढलेल्या किंमतीवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स भरावा लागेल.

तुम्हाला ते सोनं विकून झालेला फायदा एकूण उत्पन्नात जोडला जाईल. मग तुम्ही ज्या कर मर्यादेत असाल त्या हिशोबाने हा कर चुकवावा लागतो.

ही घ्या खबरदारी

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

=======================================================================================

VIDEO : आमचं ठरलंय, शिवसेनेनं भाजपला दिला 'हा' निरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldTax
First Published: Oct 26, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या