नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : अमेरिकन डॉलरची किंमत घसरल्यामुळे सोमवारी सोन्याच्या किंमतीत (Gold Prices) मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकड्यांमुळे आणि कोरोना (COVID-19) महामारीमुळे सुरु असलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी जागतिक आर्थिक सुधारणेबद्दल भीती व्यक्त करण्यात आली होती. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परदेशी बाजारात सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वधारला आणि तो प्रति औंस 1,935.53 डॉलर पोहोचला आहे.
देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचं झालं तर देशी वायदा बाजारावर म्हणजेच MCX वरही आज सकाळी सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. MCX वर सोन्याचा भाव 107 रुपयांनी वाढून म्हणजेच 0.21 टक्क्यांनी वाढून 50785 रुपयांवर आला आहे तर चांदीदेखील 872 रुपयांनी वाढून 68138 रुपयांवर बंद झाली.
कोरोनाचा धोका वाढल्यामुळे या जिल्ह्यात 7 दिवसांचा कर्फ्यू लागू, सर्व व्यवहार बंद
शुक्रवारी सोनं-चांदी 700 रुपयांपर्यंत होती स्वस्त
दिल्ली बुलियन मार्केटमधील 10 ग्रॅम सोन्याची किंमत शुक्रवारी प्रति दहा ग्रॅम 52 हजार रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात प्रतिकिलो 700 रुपयांची मोठी घसरण आली होती. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 51,826 रुपयांवरून घसरून 51,770 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली होती. या वेळी दर दहा ग्रॅममागे 56 रुपयांनी घट झाली होती.
सोन्याप्रमाणेच चंद्राच्या किंमतीतही मोठी घट दिसून आली आहे. शुक्रवारी एक किलो चांदीची किंमत दहा ग्रॅम 69,109 रुपयांवरून घसरून 68,371 रुपये झाली.
अरे देवा! पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाला कोरोना
BIS App च्या मदतीने ग्राहकांनी सोन्याची शुद्धता तपासून पाहावी
फसवणूकीच्या घटना वाढल्याने ग्राहक आता BIS App च्या मदतीने सोनं खरं आहे की खोटं हे तपासू शकतात. वस्तूंशी संबंधित कोणतीही तक्रार, परवाना, नोंदणी आणि हॉलमार्कची सत्यता या अॅपद्वारे तपासता येणार आहे. गेल्या महिन्यातच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बीआयएस केअर अॅप लॉन्च केले होते. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहकही त्वरित तक्रार करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.