Home /News /news /

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला, चांदीमध्येही घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढला, चांदीमध्येही घसरण; काय आहे आजचा भाव?

सोनं आणि चांदीच्या किंमतीवर (Gold and Silver Price) आधीच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बुधवारी देखील दबाव कायम आहे.

    नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: सोनं आणि चांदीच्या किंमतीवर (Gold and Silver Price) आधीच्या सत्रात मोठी घसरण झाल्यानंतर बुधवारी देखील दबाव कायम आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) आधीच्या सत्रात सोन्याची वायदे किंमत किरकोळ वाढ झाल्यानंतर 46,980 रुपये प्रति तोळावर पोहोचली होती. तर चांदीच्या वायदे किंमतीत देखील किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनंतर चांदी 64,658 रुपये प्रति किलोवर होती. आधीच्या सत्रात सोनं आणि चांदीचे दर जवळपास 1 टक्क्यांनी उतरले आहेत. ग्लोबल संकेत कमजोर झाल्याने सोन्याचांदीचे दर आज उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर बुधवारी 1800 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी आहेत. डॉलरमध्ये आलेली मजबुती आणि बाँड यील्डमध्ये झालेली वाढ याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्डची किंमत वाढून  1,796.03 डॉलर प्रति औंसवर आहे. चांदीच्या दरात 0.1 टक्क्यांची तेजी आल्याने दर 24.32 डॉलर प्रति औंसवर आहेत. तज्ज्ञांच्या मते चांदीचे दर 23.70 डॉलरपेक्षा जास्त असल्याने यामध्ये तेजी येऊ शकते. हे वाचा-आज किती रुपयांत खरेदी करता येणार पेट्रोल-डिझेल? इथे वाचा लेटेस्ट दर सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जोपर्यंत सोन्याची किंमत $ 1,835 ओलांडत नाही तोपर्यंत ती विक्रीचा दबाव राहू शकतो. स्टॉक मार्केट्समधील तेजीचा परिणाम सोन्यावर होत आहे. यामुळे गुंतवणुकदारांची सोन्यातील रुची कमी झाली आहे. हे वाचा-मुंबईतील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई, भरावा लागणार 2 लाखांचा दंड मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या