मुंबई, 15 मार्च : गेल्या आठवड्याभरामध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत होणारे बदल आणि त्याचप्रमाणे कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे ढासळणारी जागतिक अर्थव्यवस्था यामुळे सोन्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर बाजारातील उलाढालीच्या परिणामामुळे सोनं स्वस्त झालं.
मुख्यत: गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत जवळपास 3000 रुपयांनी कमी झाली आहे. प्रति तोळा 44 हजारांच्या वर असणारी सोन्याची किंमत प्रति तोळा 41 हजारांच्या घरात पोहोचली आहे.
(हे वाचा- LIC ने लाँच केल्या 2 नवीन योजना, जाणून घ्या कशी कराल फायदेशीर गुंतवणूक)
आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 41,170 रुपये आहे. आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याचे भाव 44, 150 इतके होते. त्यामुळे आठवडाभरात सुमारे 2,980 रुपयांनी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.
शुक्रवारी असणारे सोन्याचे भाव
शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 1,097 रुपयांनी घसरल्यानंतर प्रति तोळा सोन्याची किंमत (gold prices today) 42,600 रुपये झाली होती. शुक्रवारी सोन्याची किंमत 128 रुपयांनी कमी होऊन 44,490 रुपये प्रति तोळा होती.
शुक्रवारी असणारे चांदीचे भाव
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीतही घसरण झालेली पाहायला मिळालं. शुक्रवारी चांदीचे दर प्रति किलो 1,574 रुपयांनी कमी झाले होते. त्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर प्रति किलो 44,130 रुपयांपर्यंत कमी झाले होते.
कशी कराल घरबसल्या कमाई?
-2013 नंतर अनेकांनी फिजिकल गोल्ड व्यतिरिक्त अन्य पर्यांयांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना पेपर गोल्ड (paper gold) मध्ये अधिक पर्याय उपलब्ध आहेत.
(हे वाचा-कोरोनाचं संकट वाढतंय!तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिक्लेम मिळणार?)
-सोन्यामध्ये गुंतवणूक करण्या व्यतिरिक्त गोल्ड डिलीव्हरीचा सुद्धा पर्याय आहे. गुंतवणुकदारां व्यतिरिक्त सामान्य नागरिक सुद्धा पेटीएम गोल्ड, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ETF यांसारख्या पर्यांयाचा फायदा घेऊ शकता.
-एमसीएक्स गोल्ड गुंतवणुकदारांना कमीत कमी 1 ग्रॅम सोनं खरेगी करण्याचा पर्याय देत आहे. एमसीएक्स गोल्डच्या या गुंतवणुकीमध्ये कमीत 1 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करूनही डीमॅट अकाउंट ठेऊ शकता.