• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • Gold Price Today: सोन्याचा दर 5 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, खरेदी करण्याआधी इथे वाचा किंमत

Gold Price Today: सोन्याचा दर 5 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, खरेदी करण्याआधी इथे वाचा किंमत

Gold Silver Price, 10 August 2021: सोन्याच्या दरात मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर दर 45 हजार रुपये प्रति तोळाच्या जवळपास आहेत. तर चांदीचे दर 898 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर आज (Gold Price Today) पुन्हा एकदा घसरले आहेत. यामुळे सोन्याचे दर 45 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) देखील आज मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे चांदीची किंमत 62 हजार रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचली आहे. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर  45,286 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदी 62,663 रुपये प्रति किलो होती. दरम्यान भारतीय सराफा बाजारापेक्षा उलट परिस्थिती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे. याठिकाणी किंमती वाढल्या आहेत तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Price Today on 10th August) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 176 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे सोन्याचे दर 45000 रुपये प्रति तोळाच्या जवळपास पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 45,110 रुपये प्रति तोळा आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,735 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा-Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द? चांदीचे नवे दर (Silver Price Today on 10th August) चांदीच्या किंमतीत आज पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 62 हजार रुपये प्रति किलोपेक्षा कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 898 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर चांदी 61,765 रुपये प्रति किलोवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. चांदीचे दर याठिकाणी 23.56 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-तुमच्या खात्यात नाही आले PM Kisan चे 2000? त्वरित नोंदवा या क्रमांकांवर तक्रार सोन्याचांदीच्या किंमतीत का झाली घसरण? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मुल्य जबरदस्त वधारले आहे, त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण जारी आहे. तर अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या मागणीवर परिणाम होत आहे. यामुळे सोन्याच्या किंमती कमी होत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: