Home /News /news /

डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण, आता सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांचं मत वाचा

डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण, आता सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांचं मत वाचा

डॉलरच्या निर्देशांकाबाबत गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की दोन दशकांच्या नवीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर तो आणखी वाढू शकेल. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत स्पॉट सोन्याची किंमत 1780 ड़ॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते. त्याच वेळी, MCX वर सोन्याचा दर 48,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 मे : डॉलर इंडेक्स दोन दशकांच्या उच्चांकावर पोहोचल्याने सलग चौथ्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण सुरू आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोन्याचा भाव 49,909 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. यासह, सोन्याला साप्ताहिक सुमारे 2.86 टक्के नुकसान सहन करावे लागले. स्पॉट गोल्ड 1810 डॉलर प्रति औंस वर बंद झाले, याचा अर्थ असा आहे की ते 1820 डॉलरची महत्त्वपूर्ण सपोर्ट लेव्हल तोडणार आहे. कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांना मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरांबद्दलच्या (Reserve Bank of India) कठोर भूमिकेबद्दल आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukarian War) जागतिक आर्थिक विकासात व्यत्यय येण्याची चिंता आहे. दोन चिंतेच्या दरम्यान, ते सोन्यामधून पैसे काढून घेत आहेत आणि अमेरिकन डॉलर्स आणि अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. डॉलरच्या निर्देशांकाबाबत गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की दोन दशकांच्या नवीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर तो आणखी वाढू शकेल. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत स्पॉट सोन्याची किंमत 1780 ड़ॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते. त्याच वेळी, MCX वर सोन्याचा दर 48,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकतो. रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते फायद्याची, कशी आणि कोणते घटक ठरतील महत्वाचे, चेक करा कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी. त्यांनी गुंतवणूकदारांना स्पॉट मार्केटमध्ये 1780 डॉलर आणि MCX वर 48,800 रुपये या प्रमुख सपोर्ट स्तरावर सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला. सोन्याबद्दल तज्ज्ञांचा अजूनही सकारात्मक दृष्टीकोन आहे. म्हणून किंमतीवर परिणाम होतो रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या कमोडिटी अँड करन्सी रिसर्चच्या उपाध्यक्षा सुगंधा सचदेवा यांनी लाइव्हमिंटला सांगितले की, व्यापक आर्थिक बाजारातील जोखमीचा सोन्यावरही परिणाम झाला आहे. तो 2.86 टक्क्यांच्या घसरणीसह तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्यात सलग चौथ्या आठवड्यात घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या निर्देशांकात दोन दशकांतील सर्वात मोठी झेप आहे. Health Insurance घेताना 'या' गोष्टी तपासून घ्या, अन्यथा गरजेच्या वेळी होईल मनस्ताप फेडकडून पुन्हा दरवाढीची भीती ताज्या आकडेवारीनुसार, मार्चच्या तुलनेत अमेरिकेतील कन्ज्युमर प्राईज इंडेक्समध्ये घट झाली आहे. मात्र एप्रिलमध्ये 8.3 टक्के वार्षिक वाढीसह ते अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ते खूप जास्त असल्याने, यूएस फेडच्या जूनच्या बैठकीत पुन्हा एकदा व्याजदरात 50 बेसिस पॉइंट वाढ होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. त्याच वेळी, भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे आणि या आठवड्यात तो 77.63 अंकांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या भावाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या