सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! सोनेखरेदीआधी गुरुवारचे दर इथे वाचा

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! सोनेखरेदीआधी गुरुवारचे दर इथे वाचा

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सोन्याला नवी झळाळी मिळाली आहे. मात्र ऐन लग्नसराईच्या दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी: सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेलं गुरूवारच्या दरावरून पाहायला मिळालं.  दिल्लीतील सराफा बाजारात जवळपास 1 हजार 600 रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोन्याला जरी नवी झळाळी आली असली तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऐन लगीन सराईच्या दिवसांमध्ये सोन्यानं चाळीशी पार केली आहे. आठवड्याच्या सुरुवातील सोनं 233 रुपयांनी स्वस्त झालं होतं तर मंगळवारी दर स्थिरावत नाहीत तोपर्यंत आज दर वधारले आहेत. आज आणि उद्या हे दर स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर चांदीचे दर सराफ बाजारात तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्या-चांदीचे नवे भाव

दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 41,661 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर चांदीसाठी प्रति किलोमागे 47 हजार 794 रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीचे दर 224 रुपयांधी वधारले आहेत.

का वधारले सोन्याचे भाव?

सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. एक किलो चांदीचा भाव (Silver Prices)157 रुपयांनी कमी झाला होता. तर सोन्याचे भाव 233 रुपयांनी घटले होते. चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने बाजारात तेजी आली आणि त्यामुळे सोनं -चांदीच्या किंमती कमी झाल्याचा HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितलं होतं. मात्र पुन्हा एकदा सोन्या-चांदीचे दर तेजीत आल्याचं पाहायला मिळत आहे.लगीन सराईच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा सोन्याचांदीची मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये वाढ झाली आहे.

अन्य बातम्या

CORONAVIRUS मुळे खिशाला चाप, मोबाईल, टीव्ही, फ्रिज आणि एसी महागणार

2 मार्चपासून येणारे SBI IPO कार्ड्स ठरणार फायद्याचे

First published: February 20, 2020, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या