Home /News /news /

जेवण करण्यासाठी ढाब्याकडे जात होते, अचानक भरधाव ट्रकने 3 जणांना चिरडले!

जेवण करण्यासाठी ढाब्याकडे जात होते, अचानक भरधाव ट्रकने 3 जणांना चिरडले!

मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागपूर येथून दोन ट्रक तांदूळ भरुन अमरावतीकडे जात होते.

नागपूर, 29 सप्टेंबर :  नागपूर-अमरावती महामार्गावरील कोंढाळी नजीकच्या सबा ढाब्यावर जेवायला जाणाऱ्या 3 जणांना ट्रकने चिरडले. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागपूर येथून दोन ट्रक तांदूळ भरुन अमरावतीकडे जात होते. कोंढाळी इथं आल्यावर सबा ढाबा आहे. सबा ढाब्यावर जेवण करण्यासाठी ट्रकचालक शेख अन्नू  जावेद खान  शेख यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला. त्यानंतर सर्वजण हे ढाब्यावर जेवण्यासाठी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. यात तीन जण चिरडले गेले. नगरमध्ये राष्ट्रवादीच्या खेळीवर फडणवीसांचा आक्षेप,अखेर 'त्या' नेत्याला नोटीस या अपघातात ट्रकचालक शेख अन्नू  जावेद खान  शेख परवेज (राहणार अकोला) यांचा मृत्यू झाला. यात एक चालक फिरोज खान  जखमी झाला असून ट्रक क्लीनर सोहेल खान हा यातून बचावला आहे. धडक देणारा ट्रक अमरावतीकडे पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. वाशिममध्ये बस अपघातात 1 ठार दरम्यान, वाशिममध्ये  कारंजा - अमरावती महामार्गावर कामरगांव नजीक श्रेयस ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 7 ते 8 प्रवाशी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. औरंगाबादवरून नागपूर ही बस जात होती. उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच, सेनेनं फूट पाडणाऱ्यांना फटकारलं महामार्गावरील टाकलेला मातीचा ढिगारा न दिसल्यानं अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघाताच्या ठिकाणी एका मोटरसायकलचाही अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या