आरके स्टुडिओची अखेर विक्री, गोदरेज कंपनीनं केला खरेदी

आरके स्टुडिओची अखेर विक्री, गोदरेज कंपनीनं केला खरेदी

स्टुडिओ हा गोदरेज कंपनी विकत घेणार असल्याची आधीपासूनच चर्चा होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 03 मे : बॉलिवूडच्या अनेक अजरामर कलाकृतींचं जन्मस्थान असलेला चेंबूरच्या आरके स्टुडिओचा ताबा अखेर गोदरेज कंपनीकडे देण्यात आला आहे. कपूर घऱाण्याचा मालकी हक्क असलेला हा आरके स्टुडिओ आता गोदरेज प्रॉपर्टीजनं विकत घेतला आहे.

यासंदर्भातली अधिकृत माहिती गोदरेज कंपनीकडून देण्यात आली आहे. पण नेमक्या किती किंमतीमध्ये हा स्टुडिओ विकत घेण्यात आला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरके स्टुडिओ हा गोदरेज कंपनी विकत घेणार असल्याची आधीपासूनच चर्चा होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाला आहे.

आरके स्टुडिओचा मालकी हक्क संस्थापक राज कपूर यांचे तीन चिरंजीव ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे होता. 21 सप्टेंबर 2017 ला आरके स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर स्टुडिओचा खर्च चालवणं कपूर घराणाल्या जमत नसल्याची चर्चा होतीच. त्यानंतर कपूर परिलतच गोदरेज प्रॉपर्टींजनं चेंबूरमधील ही जवळपास सव्वादोन एकर जागा सुमारे 175 कोटींना विकत घेतल्याची माहिती होती. तर बॉलिवूडचा हा राजवाडा आता इतिहास जमा होईल अशी खंत सिने क्षेत्राचे अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

आरके स्टुडिओ, चंदेरी दुनियेतली ही सोनेरी आठवण

1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 मध्ये शोमॅन राज कपूर यांच्या स्वप्नाची पूर्तता झाली ती आरके स्टुडिओच्या रूपानं. भारतीय सिनेमाच्या सुवर्ण इतिहासातील ही दंतकथा.

गेली 7 दशकं आरके स्टुडिओनं चित्रपट सृष्टीतील अनेक पिढ्या पाहिल्या. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आरके स्टुडिओमधील काही भाग आगीने जळून खाक झाला.

आरके स्टुडिओ आता विकण्यात येणार आहे. हा पांढरा हत्ती पाळणं आता शक्य नाही, त्यामुळे स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आरके स्टुडिओ आता राहणार नाही पण राहतील या सुवर्णकाळाच्या कधीही न भंगणाऱ्या सोनेरी आठवणी.

'हा' VIDEO पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 'फानी' वादळाची तीव्रता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading