Home /News /news /

आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम

आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या गोंडाच्या डीसी किरण पासी यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

    रांची, 02 मार्च : असेच विचार आचारात आणा ज्याची गरज या देशाला आहे असं महात्मा गांधी म्हणून गेले. याच विचारांची सांगड घालत एका डीसी महिलेने जगासमोर एक उत्तम उदाहरण मांडलं आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या गोंडाच्या डीसी किरण पासी यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. सरकारी रुग्णालयांमधील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी वरिष्ठ पदाचा विचार न करत रविवारी सकाळी गोंडा सदर रुग्णालयामध्ये एका मुलाला जन्म दिला. उच्च पदावर असल्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व महागड्या आरोग्य सेवांचा त्याग करून त्यांनी सरकारी रुग्णालयात डिलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सकाळी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाची आणि आईची प्रकृती अगदी उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत किरण यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसूतीसाठी किरण यांनी सदर रुग्णालयाची निवड अशासाठी केली जेणेकरून सरकारी यंत्रणा आणि डॉक्टरांवर लोकांचा विश्वास बसेल आणि कमी खर्चात चांगले उपचार मिळतील. जिल्ह्यात पदस्थापना झाल्यापासून डीसी आरोग्य व शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सतत पुढाकार घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोंडा सदर रुग्णालयाला सप्टेंबर 2019 मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कायाकल्प पुरस्कार मिळाला. आता डिलेव्हरीसाठी कोणालाही अडचणी येणार नाही डीसी किरण यांचे पती पुष्पेंद्र सरोज कुमार यांनी यावर माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी किरण यांची प्रकृती ठिक असून योग्यरित्या उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी रुग्णलायातील ही सेवा पाहता आता डिलेव्हरीसाठी कोणत्याही महिलेला अडचणी येणार नाही असं पुष्पेंद्र सरोज कुमार म्हणाले. सुरुवातीपासूनच किरणवर सदर रूग्णालयाच्या डॉ.बाणदेवी झा आणि डॉ प्रभा राणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. सिव्हील सर्जन एसपी मिश्रा म्हणाले की, डीसी किरण या कामावर सुट्टी टाकून मोठ्या रुग्णालयात उपचार घेऊ शकत होत्या पण त्यांनी सामाजिक भान वाढवत आणि सरकारी यंत्रणा आणखी मजबूत बनवण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे. त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या