दुबई, 11 एप्रिल : एखाद्याला जास्तीत जास्त किती शिक्षा सुनावल्याचं तुम्ही ऐकलंय. भारतात मरेपर्यंत जन्मठेप हा जास्तीत जास्तीत शिक्षेचा कालावधी म्हणता येईल मात्र दुबईत दोन भारतीयांना तब्बल 500 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
मुळचा गोव्याचा रहिवासी सिडनी लिमोस आणि त्याचा साथीदार रियान डिसूझाला दुबई न्यायालयानं 500 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.
चिट फंड घोटाळा करून गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी दुबई न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय. या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लिमोस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा