गोवा : आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवताना पूल कोसळला ; 2 ठार, 30 जण बेपत्ता

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती तेव्हा ही घटना घडली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2017 12:01 AM IST

गोवा : आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवताना पूल कोसळला ; 2 ठार, 30 जण बेपत्ता

18 मे : दक्षिण गोव्यातील जुना पोर्तुगीजकालिन पुल कोसळून 50 जण नदीत पडल्याची घटना घडलीये. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती तेव्हा ही घटना घडली. या दुर्घटनेत 2 जण ठार झाले आहे. तर अजूनही 30 जण बेपत्ता आहे.

दक्षिण गोव्यातल्या सावर्डे भागातील कुरचेरी गावातला पूल कोसळला. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी पुलावर जवळपास पन्नास लोकं असल्याचं सांगण्यात येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण आत्महत्या करण्यासाठी पुलावर उभा होता. या तरुणाला वाचवण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. लोकांच्या वजनामुळे अचानक हा पूल कोसळला.

या दुर्घटनेत 20 जणांना वाचवण्यात आलंय. अजूनही 30 जण बेपत्ता असल्याचं कळतंय. घटनास्थळी भारतीय नौसेना दाखल झाली आहे. तसंच एनडीआरएफची टीमही मदतकार्यासाठी पोहचली आहे. 10 पानबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडलीये.

तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा केली असून बचाव आणि शोधपथकाची मोहीम वाढवण्यात आलीये असं टिवट् केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...