माजी आरोग्य मंत्र्यांचं कोरोनामुळे निधन, भाजपवर शोककळा

माजी आरोग्य मंत्र्यांचं कोरोनामुळे निधन, भाजपवर शोककळा

गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. अखेर संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • Share this:

अनिल पाटील, प्रतिनिधी

मडगाव (गोवा), 06 जुलै : कोरोनामुळे गोव्याच्या माजी आरोग्य मंत्र्यांचं निधन झालं आहे. गोव्यात कोरोनाचा आठवा बळी झाला आहे. माजी आरोग्य मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ सुरेश आमोणकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मडगावच्या कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. अखेर संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

युजीडीपी-भाजप सरकारमध्ये ते आरोग्य खात्याचे मंत्री होते. याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून ही काही दिवस त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गोवा सरकारवर शोककळा पसरली आहे. आमोणकर हे 68 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाकडून गेली नोटीस

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात पाळी हा त्यांचा मतदारसंघ होता. नंतर ते गोवा सुरक्षा मंचच्या तिकिटावर उभे होते पण पराभूत झाले. त्या अगोदर 1999 आणि 2002 निवडणूकित ते भाजपा तिकिटावर विजय झाले होते. आमोणकर हे आधी फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकारमध्ये होते. त्यानंतर ते पर्रीकर मंत्रिमंडळातही होते. त्यावेळी ते आरोग्य खातं सांभाळत होते.

राज्यात 8 जुलैपासून सुरु होणार हॉटेल्स आणि लॉज, असे असतील कठोर नियम

अतिशय शांत, सौम्य स्वभावाचे मंत्री आणि डॉक्टर अशी आमोणकर यांची ओळख होती. आमोणकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमोणकर यांची मुत्रपिंडे निकामी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

संपादन आणि संकलन - रेणुका धायबर

Published by: Manoj Khandekar
First published: July 6, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading