गोव्यात काँग्रेसला धक्का, विश्वजित राणेंचा भाजपमध्ये प्रवेश

गोव्यात काँग्रेसला धक्का, विश्वजित राणेंचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे पूत्र आणि काँग्रेस आमदार विश्‍वजित राणे यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

  • Share this:

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे पूत्र आणि काँग्रेस आमदार विश्‍वजित राणे यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी गेली आठवडाभर चर्चा होती.

विश्वजित राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे प्रतापसिंह राणे हेही भाजपमध्ये येतील की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण गोव्यातल्या सत्तरी भागात दोन विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी वाळपई मतदारसंघातून विश्‍वजित यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर पर्ये या दुसऱ्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व त्यांचे वडील प्रतापसिंह करतात. यानंतर वाळपई मतदारसंघातून  भाजपच्या उमेदवारीवर विश्‍वजित विधानसभेची पोट निवडणूक लढतील मात्र पर्ये मतदारसंघ प्रतापसिंह राणे असताना भाजपमय कसा होईल याचं कुतूहल सर्वांना आहे.

राज्यसभेच्या जुलैमध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रतापसिंह राणे यांना भाजपकडून संधी देऊन पर्येतून विश्‍वजित यांच्या पत्नी डॉ. दिव्या यांना विधानसभा उमेदवारीची संधी दिली जाऊ शकते . मात्र प्रतापसिंह यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असे स्पष्ट केल्याने विश्‍वजित सत्तरी तालुका भाजपमय कसा करतील हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरलं आहे.

विश्‍वजित हे आरोग्यमंत्री असताना त्यांच्या अनेक निर्णयांना पर्रीकर यांनी कडाडून विरोध केला होता. त्याबाबत पर्रीकर यांना विश्‍वजित यांच्या भाजप प्रवेशावेळी विचारले असता ते म्हणाले, धोरण आणि निर्णयाला विरोध होता, व्यक्तीला नव्हता. आताही भाजपचेच निर्णय आणि धोरण विश्‍वजित यांना पुढे न्यावं लागेल,  असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी स्पष्ट केलं आहे.

First published: April 7, 2017, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading