मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Go..Goa..With School buddies..बसमधील तो सेल्फी ठरला शेवटचा; 11 जणांच्या मृत्यूने मोदीही झाले भावुक!

Go..Goa..With School buddies..बसमधील तो सेल्फी ठरला शेवटचा; 11 जणांच्या मृत्यूने मोदीही झाले भावुक!

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र-मैत्रिणी आनंदाने गाणी गात..नाचत गोव्याच्या दिशेने चालले होते आणि तेवढ्यात...

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र-मैत्रिणी आनंदाने गाणी गात..नाचत गोव्याच्या दिशेने चालले होते आणि तेवढ्यात...

शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत मित्र-मैत्रिणी आनंदाने गाणी गात..नाचत गोव्याच्या दिशेने चालले होते आणि तेवढ्यात...

कर्नाटक, 15 जानेवारी : आज सकाळीच एक सुन्न करणारी बातमी समोर आली. नववर्षाच्यानिमित्ताने मित्रमैत्रिणींसोबत गोव्याला जाणाऱ्या 11 जणांवर काळाने घाला घातला. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर (Dharwad National Highway) मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि  या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. याचे फोटो इतके भयंकर होते की ते वाचकांना दाखवूही शकत नाही. (That selfie in the bus was the last) रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता. काही तासांपूर्वी ही मित्रमंडळी आनंदाने गाणी गात-नाचत चालली होती. गेल्या वर्षभरापासून कहर माजवणारा कोरोना आणि कामाच्या व्यापातून काही काळ सुटका म्हणून या मित्रमैत्रिणींनी ही ट्रिप आयोजित केली असावी. मात्र दुर्देवाने त्यांना हा आनंदही घेता आला नाही.

अपघातापूर्वीचा एक फोटो समोर आला आहे. मित्रमैत्रिणींसोबतचा एक सेल्फी बरंच काही बोलून जाते. प्रिती नावाच्या एका तरुणीने आपल्या स्टेटसवर हा फोटो ठेवला होता. यावर तिने लिहिलं होतं...गो..गोवा..विथ स्कूल बडीज...येत्या ट्रिपमध्ये सर्वांसोबत खूप धमाल..खूप फोटो आणि सेल्फी काढण्याची प्लानिंग सुरू असताना दुर्देवाने या ग्रुपचा हा शेवटचा सेल्फी ठरला आहे. (That selfie in the bus was the last)

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहुन मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप गोव्याला मिनी बसने जात होता. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे.

या अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावरील आक्रोश मन सुन्न करणारा होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करुन दु:ख व्यक्त केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी मोदींच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांनी धारवाड-हुबळी मार्गावरील लेन वाढविण्याची मागणी केली आहे. एकेरी रस्ता असल्याचे येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे.

First published:

Tags: Narendra modi, Road accidents