नेस वाडियाच्या एअरलाइन्सने म्हटलं, ‘प्रिती झिंटाला फ्लाइटमधून प्रवास करायला अडवलं नाही’

नेस वाडियाच्या एअरलाइन्सने म्हटलं, ‘प्रिती झिंटाला फ्लाइटमधून प्रवास करायला अडवलं नाही’

प्रिती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाची एअरलाइन्स गो एअरने तिला त्यांच्या विमानातून प्रवास करू न दिल्याची बातमी समोर आली.

  • Share this:

नवी दिल्ली, ०७ एप्रिल- बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रितीचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडियाची एअरलाइन्स गो एअरने तिला त्यांच्या विमानातून प्रवास करू न दिल्याची बातमी समोर आली. अखेर रविवारी गो एअरकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले.

रिपोर्ट्सनुसार, प्रितीला मुंबईहून सकाळी ८.३० वाजताच्या फ्लाइटसाठी बोर्डिंग करायचे होते. मात्र ती विमानतळावर पोहोचण्याआधीच एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडून प्रितीचा बोर्डिंग पास परत घेण्यात आला. प्रितीने जेव्हा याबद्दल कारण विचारले तेव्हा एअरलाइन्सकडून कळवण्यात आले की, वाडिया ग्रुपकडून प्रितीला या एअरलाइन्सकडून प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.मात्र, आता एअरलाइन्सने एक स्टेटमेन्ट जारी करत असं काही झालं नसल्याचं स्पष्ट केलं. एअरलाइन्सने म्हटल्यानुसार, प्रितीने ३० मार्चला मुंबईहून चंदीगढला प्रवास केला. त्यानंतर २ एप्रिलाला तिने चंदीगढवरून मुंबईसाठी रिटर्न फ्लाइटही बूक केली होती. पण तिनेच यातून प्रवास केला नाही. प्रितीने अमेरिकन फायनानशिअल एनालिस्ट जीन गुडएनफशी लग्न केलं. याआधी ती नेस वाडियासोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.

VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या