• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • अभिनय सोडून शाळेत शिकवतात परेश रावल यांच्या पत्नी, आता मिळू शकतं ७ कोटीचं बक्षीस

अभिनय सोडून शाळेत शिकवतात परेश रावल यांच्या पत्नी, आता मिळू शकतं ७ कोटीचं बक्षीस

गुजरातमधील लावड प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या स्वरुप संपत यांचं नाव १७९ देशांतून आलेल्या १० हजाराहूंन जास्त शिक्षकांमधून निवडण्यात आलं आहे.

 • Share this:
  मुंबई, २२ फेब्रुवारी २०१९- अभिनेते आणि खासदार परेश रावल यांच्या पत्नी आणि अभिनेत्री स्वरुप संपत यांना प्रत्येकानेच कधी ना कधी टीव्हीवर पाहिले आहे. मात्र अनेक वर्ष त्या मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. नुकतीच त्यांनी ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमात छोटेखानी भूमिका साकारली. याआधी स्वरुप यांनी ‘की और का’ सिनेमात करिना कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. एक उत्कृष्ट अभिनेत्री असूनही स्वरुप मोठ्या पडद्यापासून दूर का राहतात असा प्रश्न अनेकांना पडतो. संपत स्वरुप या गुजरातमधील एका प्राथमिक शाळेत मुलांना शिकवतात. स्वरुप यांचं नाव Varkey Foundation च्या Global Teacher Prize च्या नामांकनासाठी निवडण्यात आलं आहे. जगभरात फक्त १० लोकांच्या नावाची निवड या पुरस्कारासाठी होते. स्वरुप यांच्या नावाची यावेळी निवड करण्यात आली आहे. शिकवणीच्या कलात्मक पद्धतीसाठी स्वरुप यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. आपल्या शिकवणीतून त्या समाजातील वेगवेगळ्या स्थरातील लोकांना शिक्षित करण्याचं काम त्या करतात. गुजरातमधील लावड प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या स्वरुप संपत यांचं नाव १७९ देशांतून आलेल्या १० हजाराहूंन जास्त शिक्षकांमधून निवडण्यात आलं आहे. विजेत्याचं नाव पुढच्या महिन्यात दुबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात घोषित केलं जाईल. या घोषणेनंतर स्वरुप संपत रावल म्हणाल्या की, त्यांना ही बातमी कळली तेव्हा आनंद झाला. लोक तुम्हाला पाहत आहेत आणि शिक्षकांचं काम लोकांच्या नजरेत येत आहे याचा त्यांना आनंद आहे. जगभरात फार कमी लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळतं. अशा कार्यक्रमामुळे शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळतं. Special Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा
  First published: