दूध संघाचे थकलेले 180 कोटी द्या, नाहीतर आंदोलन - नवलेंचा इशारा

दूध संघाचे थकलेले 180 कोटी द्या, नाहीतर आंदोलन - नवलेंचा इशारा

'सरकारने दूधसंघाचे थकवलेले 180 कोटी रूपये रूपये तातडीने द्यावे,नाहीतर आंदोलन करू'

  • Share this:

हरिष दिमोटे,ता.30 सप्टेंबर : दुधाला पंचविस रूपये भाव देण्याची सरकारची घोषणा पोकळ ठरलीय. पन्नास दिवस उलटून गेले तरी सरकारकडून दुध डेअरींना अजुन 180 कोटींचं अनुदान दिलं गेलं नाही. सरकारने हे थकवलेले 180 कोटी रूपये रूपये तातडीने द्यावे नाहीतर आंदोलन करू असा इशारा कम्युनिष्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी दिलाय.

राज्यात दुध दरासाठी झालेल्या जन आंदोलनानंतर राज्य सरकाने प्रतिलीटर पंचविस रूपये दर देण्याची घोषणा केली होती. मात्र आज पन्नास दिवस उलटून गेले आहे तरी शेतकऱ्यांना अजुनही हा दर काही मिळाला नाही. सरकारकडून दुध डेअरींना प्रतिलीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले मात्र आजवरचे 180 कोटी रुपये थकवल्याने शेतकरी दुध दरापासून वंचित आहेत.

ISI ने रचला POK पंतप्रधानांच्या हत्येचा कट, त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं?

सरकारने लवकरात लवकर दुधाचे अनुदान जमा करावे अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अजित नवले यांनी दिलाय.

काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनात दूध रस्त्यावर ओतलं गेल्यानं त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. तर राजू शेट्टी यांनी मुंबईचा दूधपुरवढा तोडण्याचाही इशारा दिला होता. या आंदोलनात विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या.

VIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार

त्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यानंतर दुधाला एका लिटरला 25 रूपये देण्याचं जाहीर झालं मात्र सरकारने त्याचं अनुदान दिलं नसल्याने दुध संघ अडचणीत आले असून शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय.

 

VIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार

First published: September 30, 2018, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading