नागपूर, ता. 23 जुलै : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ द्या अशी मागणी आज संसदेत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य समता आणि सलोखा राखणारे आहे. अस्पृश्यता निवारण, महिला अत्याचारबंदी, सक्तीचे शिक्षण, जल व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रात राजर्षी शाहूंनी मोलाचे कार्य करून ठेवले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर द्यावा अशी मागणी महाडिक यांनी लाऊन धरली आहे.
जमावाकडून होणाऱ्या हत्येंविरोधात केंद्र करणार कायदा
राजर्षी शाहू महाराजांनी अवघ्या आयुष्यात जे कार्य़ करून ठेवले आहे ते महान आहे. त्यांनी कृतीतून समाजबांधणीचे काम केले. त्यांचे विचार हे समता आणि बंधुता निर्माण करणारे आहेत. देशाला आज याच विचारांची गरज आहे. तरुणांना या विचारांची प्रेरणा आवश्यक आहे. शाहू महाराज हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी जातीय निर्मूलन भाषणातून नव्हे, तर कृतीतून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक हे वर्तमानपत्र काढण्यासाठी आर्थिक मदत केली. सर्व समाजांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले आहे. स्त्री शिक्षणाबद्दल त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता. १९१७ साली त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा, तर १९१९ साली स्त्रियांवरील अन्याय निर्मूलन कायदा केला. त्यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेत केली.
हेही वाचा..
मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू
शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर