भोपाळ, 18 मे : इंदूरमध्ये (Indore News) 11 वीत शिकणाऱ्या डॉक्टरच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. विद्यार्थीनीला कोचिंगच्या दोन मुलांनी सिगारेट पिताना पाहिलं होतं. त्यांनी मुलीचे फोटो काढले होते आणि तिला ब्लॅकमेल करीत होते. विद्यार्थिनीने एक दिवसआधी वडिलांना याबाबत सांगितलं होतं. मात्र तरीही तिला फोटो व्हायरल होण्याची भीती होती. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
राजेन्द्र नगर TI मनीष डाबर यांनी सांगितलं की, हिरन्या (18) हिने रविवारी सायंकाळी उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ती मालवा कन्या शाळेत 11 वीत शिकते. घटनेच्या वेळी विद्यार्थिनीची आई आणि वडील घराबाहेर गेले होते. 10 वर्षांची छोटी बहीण आणि 4 वर्षांचा भाऊ इमारतीच्या खाली खेळत होता. यादरम्यान हिरन्याने हे पाऊल उचललं.
आई-बाबा घरी आले तर पाहिलं...
सायंकाळी जेव्हा आई-बाबा परतले तर हिरन्या गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. वडील मुलांचे डॉक्टर आहेत. तर त्यांची आई बडवानीमधील सरकारी रुग्णालयात नर्स आहे. ती दर शनिवारी इंदूरला येत होती आणि सोमवारी सकाळी परतत होती. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. संबंधित विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
ब्लॅकमेलिंगमध्ये त्रस्त होती हिरन्या...
शनिवारी हिरन्याने आपल्या वडिलांना सांगितलं की, तो कोचिंगमध्ये बाहेर निघाल्यानंतर तो आपल्या मित्रांसह सिगारेट पित होती. यादरम्यान कोचिंगमध्ये एकत्र शिकणारा एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने तिचे फोटो काढले. ते फोटो दाखवून ते हिरन्याला ब्लॅकमेल करीत होते. ते फोटो आई-बाबांना दाखवण्याची धमकी देत होते. जेव्हा हिरन्याने वडिलांना याबाबत सांगितलं की, तर ते तिला ओरडले आणि यापुढे असं न करण्याचं सांगितलं. त्यांनी हिरन्याला माफ केलं होतं. वडिलांनी सांगितलं की, तिला भीती होती की, मित्र तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतील. यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.