भिवंडी, 07 जुलै : नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या महिलेशी वर्षभरापासून प्रेमसंबंध जोडून शारीरिक भूक भागविणाऱ्या तरुणाला लग्न करण्यास सांगितले असता त्यास नकार दिला. यावरून संतापलेल्या प्रेयसीने धारदार विळ्यानं प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून लिंग छाटल्याची घटना केजीएन चौक, नवीवस्ती येथे शनिवारी मध्यरात्री घडली आहे.
फकरू फजदुरू रहेमान खान ( 30 रा. नवीवस्ती ) असं प्रेयसीच्या हल्यात जखमी झालेल्या प्रियकराचं नांव आहे. त्याचं गेल्या वर्षभरापासून शेजारी राहणाऱ्या निल निप्पी ( 30 ) या महिलेशी प्रेमसंबंध आहेत. फकरूला निप्पी हिने लग्नाची विचारणा केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे फकरू हा फक्त आपला शरीर संबंधासाठी वापर करीत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
या रागातून निल निप्पी हिने काळोखात फकरू याची पॅन्ट खेचली आणि धारदार विळा लिंगावर फिरवून त्याला गंभीर जखमी केलं. जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या फकरूला शेजारच्या नागरिकांनी तात्काळ काशिनाथ पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून या हल्ल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात निल निप्पी हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून शारीरिक उपभोग घेणाऱ्या फकरू याच्याविरोधातदेखील पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक देवा पाटील करत आहेत.
VIDEO : मुख्यमंत्री कुणाचा असणार? दानवेंनी केला दावा