मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

ट्यूशनमधून आल्यानंतर 3 वर्षीय चिमुरडीची भयंकर अवस्था; खारघरमधील शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार

ट्यूशनमधून आल्यानंतर 3 वर्षीय चिमुरडीची भयंकर अवस्था; खारघरमधील शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार

या प्रकरणात ट्यूशन टिचरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ट्यूशन टिचरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात ट्यूशन टिचरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

खारघर, 13 सप्टेंबर : खारघर येथील शिकवणीमध्ये तीन वर्षे मुलीला क्रूरपणे वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी साधना गायकवाड यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्यूशनमधील शिक्षिकेने 3 वर्षांच्या मुलीसोबत अत्यंत क्रूरपणे वागणूक दिली.

ऑगस्टपासून साधना गायकवाड यांच्याकडे ट्युशनसाठी पाठवत होते. त्या दिवशी वडील मुलीला घेऊन ट्यूशनला गेले. त्यानंतर सायंकाळी तिला घेण्यासाठी आले असता तिच्या डाव्या गालावरती व उजव्या हाताच्या बाहूवरती गोलाकार लाल रंगाचे डाग दिसले. त्यावेळी साधना यांना विचारले असता त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

अचानक जवळ येत तिघांनी तिला गाडीत ओढलं, पण..; चिमुकलीने असा हाणून पाडला अपहरणाचा डाव

वडील मुलीला घेऊन घरी आले. यावेळी मुलीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ छोटे लाल डाग दिसत होते. म्हणून त्यांनी अवनीला शुश्रूषा हॉस्पिटल, घरकुल सोसायटी, खारघर येथे नेले. डॉक्टरांनी हे डाग भाजल्यामुळे झाले असावेत असे सांगितले व अंगावर लाल रंगाच्या डागाच्या ठिकाणी त्वचा काळसर पडल्याचे दिसून आले.

यावेळी साधना गायकवाड यांनी त्यांच्या मुलीला क्रूरपणे वागणूक देऊन दुखापत केली असल्याची खात्री झाली. मात्र साधना गायकवाड यांनी हे कृत्य केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे ट्युशनच्या शिक्षिका साधना गायकवाड यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षिकेने असं का केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही. तरी मुलीच्या पालकांकडून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: